Pandharpur Vivah Sohala : वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न ; हजारो भक्तांची मांदियाळी

51
Pandharpur Vivah Sohala : वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न ; हजारो भक्तांची मांदियाळी
Pandharpur Vivah Sohala : वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न ; हजारो भक्तांची मांदियाळी

पंढरपुरात (Pandharpur ) आज (2 फेब्रु.) वसंत पंचमी (Vasant Panchami) दिवशी विठ्ठल रखुमाईचा (Vitthal Rukmini ) शाही विवाह सोहळा (Pandharpur Vivah Sohala) पार पडला आहे. विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारोंच्या संख्येने भक्तांची मांदियाळी आहे. हरिनामाच्या गजरात लग्नासाठी आलेल्या भक्तांनी वऱ्हाडी मंडळी म्हणून हजेरी लावली. (Pandharpur Vivah Sohala)

100 कारागिरांनी रात्रभर घेतले परिश्रम
श्रींचा गाभारा, विठ्ठल सभामंडप, श्री संत नामदेव महाराज पायरी, उत्तर द्वार , सोळखांबी, रुक्मिणी सभामंडप, मिरवणूक रथ या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे. याकरिता सुमारे 100 कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेतले आहेत. मंदिराला विविध प्रकारच्या रंगबिरंगी फुलांनी सजविण्यात आले आहे. (Pandharpur Vivah Sohala)

1 टन ऊसाचा वापर
या सजावटीसाठी गुलाब, लाल गुलाब, पांढरा गुलाब, पिंक गुलाब, पिवळा गुलाब, जिप्सी, डिजी, सुर्यफुल, जरबरा, तगर, गुलछडी, कामिनी, शेवंती, पासली, काडी, गिलाडो, तुक्स, गोंडा (लाल पिवळा) बिजली, अस्टर इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे. सुमारे साडेतीन ते चार टन फुल् आणि 1 टन ऊसाचा वापर करण्यात आला आहे. ही सजावट पुणे येथील भाविक भारत भुजबळ यांनी देवाच्या चरणी अर्पण केली आहे. (Pandharpur Vivah Sohala)

पोशाख आषाढीत भाविकांना देण्याची व्यवस्था
विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भाविकांकडून आलेला पोशाख आषाढी यात्रा काळात भाविकांना देणगी मूल्य घेऊन देण्याची व्यवस्था केली जाते. कपड्याचा पोत लक्षात घेऊन पोशाख वस्त्रांचे देणगी मूल्य ठरते. काही साड्यांचा उपयोग मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांना भेट स्वरुपात देतात. (Pandharpur Vivah Sohala)

विठ्ठलाला पांढरे पागोटे करतात परिधान
वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे काकडा आरती वेळेस श्री विठ्ठलास सोन्याच्या मुखवट्याऐवजी पांढरे पागोटे घालण्यात येते. या दिवसापासून श्री विठ्ठलास पांढरा पोशाख रंगपंचमीपर्यंत सुरू होतो. पहाटे नित्यपूजेच्या वेळेस देवास गुलाल टाकण्यात येतो. तसेच श्री रुक्मिणी मातेकडे काकडा आरती व नित्यपूजेच्या वेळेस वसंत पंचमीनिमित्त सकाळी पांढरा पोशाख करण्यात येतो. (Pandharpur Vivah Sohala)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.