जगातील सर्वोच्च सैन्यांची क्रमवारी जाहीर करणारी संस्था ‘ग्लोबल फायरपावर इंडेक्स’ने (Global Firepower Index 2025) वर्ष २०२५ ची सूची घोषित केली आहे. यात भारतीय सैन्य चौथ्या स्थानावर आहे. जगातील सर्वांत शक्तीशाली सैन्याच्या सूचीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर रशिया (Russia), चीन (China) आणि भारत (India) यांचा क्रमांक लागतो. या सूचीमध्ये भारताचे वर्णन ‘एक महत्त्वाची सैन्य शक्ती’ म्हणून करण्यात आले आहे. हा निर्देशांक सैनिकी तुकड्या, आर्थिक स्थिती, संरक्षणाची तरतूद, सुविधा क्षमता इत्यादींसह ६० पेक्षा जास्त निकष पाहून काढला जातो.
(हेही वाचा – कोण होते Ram Singh Kuka? का पुकारलं होतं ब्रिटिशांविरुद्ध असहयोग आंदोलन?)
भारताकडे एकूण सैनिक ५१ लाख ३७ हजार आहे, ज्यामध्ये १४ लाख ५५ हजार लाख सक्रीय सैनिक आणि ११ लाख ५५ हजार राखीव सैनिक आहेत. पाकिस्तानकडे एकूण सैनिक १७ लाख ४ हजार आहे. ६ लाख ५४ हजार सैनिक सक्रीय आणि ५ लाख ५० हजार राखीव सैनिक आहेत.
भारताचा शेजारी देश पाकिस्तानकडे अण्वस्त्रे (Nuclear Weapons) असली, तरी या निर्देशांकात तो अजूनही पहिल्या १० देशांमध्ये स्थान मिळवू शकलेला नाही. या निर्देशांकात पाकिस्तान १२ व्या क्रमांकावर आहे आणि तो ब्राझिलपेक्षाही खाली आहे. भारतामागे पाचव्या स्थानी दक्षिण कोरिया, त्यानंतर युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, तुर्कीये, इटली, ब्राझिल आणि नंतर पाकचा क्रमांक लागतो. भारतावर कुरघोडी करू पहाणारा कॅनडा या क्रमवारीत २८ व्या क्रमांकावर आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community