मंत्री तथा भाजप (BJP) नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी बेकायदेशीर बांगलादेशी (Bangladesh) आणि रोहिंग्यांचे (rohingya muslims) येथे वास्तव्य असणे हा सुरक्षेचा मोठा प्रश्न असल्याचे दि. ३० जानेवारी रोजी म्हटले होते. त्यातच नितेश राणे यांनी रोहिंग्या मुसलमानांना मदत करणाऱ्यांना इशारा दिला आहे.
( हेही वाचा : राज्यात लवकरच Uniform Civil Code लागू होणार ?; डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या…)
नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) राहणाऱ्या कोणत्याही रोंहिग्या मुसलमानांना आम्ही राहू देणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या राज्यात सर्वत्र बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई सुरु आहे. मात्र पुढील काळात या कारवाईचा वेग अधिक तीव्र केला जाणार, असे राणे म्हणाले. तसेच सरकारी यंत्रणेत जे अधिकारी खोटी कागदपत्र करण्यास रोहिंग्या मुसलमानांना मदत करतात, त्यांची नाव सरकारकडे आली आहे. त्यांच्यावर पण कारवाई केली जाणार, असेही राणे म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community