कोण होते Ram Singh Kuka? का पुकारलं होतं ब्रिटिशांविरुद्ध असहयोग आंदोलन?

22
कोण होते Ram Singh Kuka? का पुकारलं होतं ब्रिटिशांविरुद्ध असहयोग आंदोलन?

राम सिंह कुका (Ram Singh Kuka) हे ‘नामधारी पंथाचे’ संस्थापक होते. सतगुरु राम सिंह हे त्यांच्या काळातील एक महान समाजसुधारक, धार्मिक नेते आणि स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी केवळ समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टींविरुद्ध लढा दिला नाही तर ते परदेशी राज्यकर्त्यांविरुद्ध प्रभावी युद्ध देखील पुकारले. त्यांनी ब्रिटिशांना इतके नामोहरण केले की त्यांना तुरुंगात टाकून रंगून म्हणजेच म्यानमार येथे पाठवण्यात आले.

राम सिंह कुका (Ram Singh Kuka) यांचा जन्म २ फेब्रुवारी १८१६ मध्ये वसंत पंचमीला लुधियानातील भैनी गावात झाला. राम सिंहजी शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. ते आध्यात्मिक आणि धार्मिक स्वभावाचे होते. ते त्यांच्या घरी प्रवचनांचे आयोजन करत आणि लोक त्यांचं बोलणं ऐकण्यात गुंग होऊन जात असत. त्यांच्या प्रवचनांचे विषय गोरक्षण, स्वदेशी, स्त्री मुक्ती, आंतरजातीय विवाह, सामूहिक विवाह इत्यादी होते. हळूहळू त्यांच्या एक वेगळा पंथ आकार घेऊ लागला, जो कुका पंथ म्हणून ओळखला जाऊ लागला.

(हेही वाचा – Accident News : रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात, तिघांचा मृत्यू, १ जण गंभीर)

राम सिंह कुका (Ram Singh Kuka) यांनी ब्रिटीश राजवटीला पूर्णपणे विरोध केला आणि त्यांच्याविरुद्ध तीव्र असहकार चळवळ सुरू केली. सर्वांनाच असं वाटतं की सत्याग्रह किंवा असहकार चळवळ मोहनदास गांधींनी सुरु केली होती. पण त्यांच्याआधी अनेक क्रांतिकारकांनी हा मार्ग स्वीकारला होता व राम सिंह हे त्यापैकीच एक होते. राम सिंह कुका यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी इंग्रजी शिक्षण, गिरणीत बनवलेले कपडे आणि बाहेरून आयात केलेल्या इतर वस्तूंवरही बहिष्कार टाकला. ब्रिटिश टपाल सेवेवर बहिष्कार टाकता यावा म्हणून त्यांच्या वैयक्तिक सैन्यात त्याचे स्वतःचे संदेशवाहकही होते.

कालांतराने कुका किंवा नामधारी चळवळीला गती मिळाली. पुढे राम सिंह कुका (Ram Singh Kuka) यांना पकडण्यात आले आणि रंगूनला पाठवण्यात आले. नंतर त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि अंदमान तुरुंगात पाठवण्यात आले. २९ नोव्हेंबर १८८५ रोजी रामसिंह कुका यांचे निधन झाले. राम सिंह यांनी त्यांच्या शिष्यांमध्ये, ज्यांपैकी बरेच जण गरीब होते, स्वाभिमानाची भावना निर्माण केली आणि त्यांना सांगितले की ते देवासाठी प्रिय आहेत. रामसिंह गेले असले तरी त्यांच्या शिष्यांची अशी श्रद्धा आहे की, “”बाबा मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा येणार आहेत”. कारण कुका लोकांमध्ये अमर होण्याची संकल्पना दृढ होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.