Solapur Crime : माजी न्यायाधिशांच्याच घरी भर दिवसा चोरी; सव्वा लाखांचे साहित्य लंपास

100
Crime : राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची २५ लाखांची फसवणूक; दोघांना अटक
Crime : राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याची २५ लाखांची फसवणूक; दोघांना अटक

बार्शी येथील माजी न्यायाधीश यांच्या घरी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम आणि लॅपटॉप व इतर साहित्य असा १ लाख २४ हजार रुपये चोरून नेल्याची घटना सकाळी भर दिवसा शिवाजी नगर भागात घडली. अ‍ॅड. नागराज शिंदे (वय ३९, रा. गुलमोहर बंगला, शिवाजीनगर, अहिल्या देवी बागेजवळ, बार्शी) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचा वकिली व्यवसाय असून घराचे दुस-या मजल्यावरती ऑफिस आहे. (Solapur Crime)

(हेही वाचा – Nitesh Rane यांनी रोहिंग्या मुसलमानांना मदत करणाऱ्यांना दिला इशारा)

२ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता वैयक्तिक कामासाठी घराच्या खालच्या खोलीत आले होते. त्या वेळी ऑफिसचा, तसेच वरती जाण्यासाठी असलेल्या बाहेरील जिन्याचे गेट उघडेच होते. त्यानंतर काम आवरून वरती ऑफिसमध्ये गेले.

तेव्हा कामासाठी टेबलवर ठेवलेला लॅपटॉप दिसुन आला नाही. दोन अनोळखी व्यक्तींनी लॅपटॉप व इतर साहित्य लंपास गेल्याचे दिसले. तसेच कपाटामधील 14 हजार रुपये मिळून आले नाहीत. बार्शी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.