शिवसेनाप्रमुखांचा नातू आदित्य ठाकरे यांना पडला मराठीचा विसर; Balasaheb Thackeray National Memorial ची माहिती दिली इंग्रजीत

नुकतेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मारकाची (Balasaheb Thackeray National Memorial) पाहणी करून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेतली.

191
दादर पश्चिम येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे स्मारक (Balasaheb Thackeray National Memorial) उभे राहत आहे. नुकतेच त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या स्मारकाविषयी माहिती सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून उबाठाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी माहिती देणारी ऑडिओ – व्हिडीओ क्लिप व्हायरल केली आहे. ही क्लिप इंग्रजी भाषेत बनवली असल्यामुळे संपूर्ण आयुष्य मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी आग्रही राहिलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या नातवाला म्हणजे आदित्य ठाकरे यांना मराठीचा विसर पडला आहे, अशी टीका होऊ लागली आहे.
या स्मारकाच्या उभारणीचे काम सध्या वेगात सुरु आहे. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण जीवनपट समोर येईल अशी माहिती देणारे हे स्मारक असणार आहे. त्यामुळे या स्मारकाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. नुकतेच उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्मारकाची (Balasaheb Thackeray National Memorial) पाहणी करून स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे पूर्ण झालेल्या कामाची माहिती घेतली. त्यानंतर हे स्मारक आणखी चर्चेत आले आहे. आता या स्मारकाची रचना कशी करण्यात आली आहे, त्यांची उभारणी कशी केली, याविषयी अधिक माहिती देणारी व्हिडीओ – ऑडिओ क्लिप बनवली आहे, मात्र ती इंग्रजी भाषेत केली आहे, त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या नातवाला मराठीचा विसर पडला आहे, अशी टीका होऊ लागली आहे.
मात्र उबाठाचे नेते सचिन अहिर यांनी मात्र याचे समर्थन केले आहे. हे स्मारक (Balasaheb Thackeray National Memorial) आंतरराष्ट्रीय पातळीवरील बनले आहे, त्यामुळे ते सर्वांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. म्हणून याची माहिती इंग्रजीत देण्यात आली आहे, यात काही चुकीचे नाही, असे सचिन अहिर म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.