पुणे मेट्रो (Pune Metro) रेल प्रकल्पाच्या बालाजीनगर मेट्रो थांब्यासाठी मेट्रोने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या जागेची मागणी केली आहे. त्यांनी तसे पत्र पोलीस ठाण्याला पाठवले आहे. मात्र, मेट्रोने मागीतल्यानूसार जाग दिल्यास पोलीस ठाण्याचा ६० टक्के भाग द्यावा लागणार आहे. यामुळे पोलीस ठाण्याचे पूर्णकामकाज ठप्प होणार आहे. यामुळे भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharati University Police) मेट्रोला पाच हजार चौरस फुट बांधकाम असलेली सुसज्ज इमारतीची मागणी केली आहे. किंवा पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत जागा ताब्यात घेऊ नये, अशी विनंती केली आहे. (Pune Metro)
स्वारगेट ते कात्रज या मेट्रोच्या भुयारी मार्गीकेच्या विस्तारास केंद्र व राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या मार्गातील बालाजीनगर स्थानकाच्या (Balajinagar Station) प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गाकरीता मेट्रोला पोलीस ठाण्याची १४.०७ चौरस मीटर जागा कायमस्वरुपी, ७६.७०७ चौरस मीटर तात्पुरत्या स्वरुपात आणि ३९.५४१ चौरस मीटर जागा जमिनीखालील कामाकरिता कायमस्वरुपी मिळण्याची मागणी केली आहे. (Pune Metro)
यावर पोलिसांनी उत्तर देताना म्हटले की, पोलीस ठाण्याची इमारत भारती विद्यापीठ शैक्षणीक संस्थेच्या मालकी हक्काच्या जागेवर प्रतीवर्ष एक रुपया भाड्याने घेण्यात आली आहे. यामुळे जागा हस्तांतरीत करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. या ठाण्याअतंर्गत साडेपाच लाख लोकसंख्या आणि ३४ चौरस किलोमीटरचा परिसर येतो. येथे वार्षीक ९०० गुन्हे आणि सरासरी ३००० पेक्षा जास्त तक्रारी प्राप्त होतात. मेट्रोला जागा दिल्यास पोलीस ठाण्याचे पुर्णकामकाज ठप्प होणार आहे. (Pune Metro)
हेही वाचा-राज्यात लवकरच Uniform Civil Code लागू होणार ?; डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या…
यामुळे मेट्रोने पर्यायी जागा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होणार असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे उत्तर देण्यात आले आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे विभाजन होऊन काही दिवसांपूर्वीच आंबेगाव पोलीस ठाण्याची निर्मीती झाली आहे. आंबेगाव पोलीस ठाणेही सध्या पोलीस चौकीत सुरू आहे. (Pune Metro)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community