तेलंगणा काँग्रेस (Congress) पक्षात सध्या चिंतेचे वातावरण आहे. या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना अचानक १० आमदारांनी एक गुप्त बैठक घेतली आहे. यामुळे रेवंत रेड्डी सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. हैदराबादच्या बाहेरील गंडीपेट येथील आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसवर ही बैठक झाल्याची चर्चा आहे.
सध्या काँग्रेसमध्ये (Congress) तेलंगणाचे माहिती व जनसंपर्क मंत्री पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात विशेष पक्षांतर्गत नाराजी वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पक्षातील वाढत्या असंतोषाच्या संदर्भात, विशेषत: पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांच्याविरोधात पक्षाच्या कमांड कंट्रोल सेंटरमध्ये मंत्र्यांची भेट घेणार आहेत. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोंगुलेती यांनी त्याचा पालेर दौरा देखील रद्द केला आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांना अशा गुप्त बैठकांना उपस्थित न राहण्याचे कठोर निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमएलसी निवडणुकीपूर्वी आमदारांच्या बंडखोरीमुळे जनतेत चुकीचा संदेश जाऊ शकतो, अशी भीती पक्षाच्या हायकमांडला वाटत आहे. तेलंगणा येथे स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहे. पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघात देखील २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीचे निकाल ३ मार्च रोजी जाहीर केले जातील. (Congress)
(हेही वाचा आंध्र प्रदेशातील Pakistan वसाहतीचे अखेर झाले नामांतर; जाणून घ्या काय आहे नवे नाव?)
बैठकीला कोण कोण आमदार उपस्थित होते?
- नैनी राजेंद्र रेड्डी
- भूपती रेड्डी
- येन्नम श्रीनिवास रेड्डी
- मुरली नाईक
- कुचाकुल्ला राजेश रेड्डी
- संजीव रेड्डी
- अनिरुद्ध रेड्डी
- लक्ष्मी कांता राव
- डोंथी माधव रेड्डी
- बीर्ला इलाह
Join Our WhatsApp Community