NVS 02 Satellite अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यास अपयश; ISRO ने सांगितले कारण…

NVS 02 Satellite : थ्रस्टर्स प्रज्वलित होण्यासाठी आवश्यक असेलले ऑक्सीडायजरचे वाल्वच उघडले नाहीत

61
NVS 02 उपग्रह अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यास अपयश; ISRO ने सांगितले कारण...

इस्रोची मंगळ, चंद्र आणि सूर्य मोहिम जगभरात गाजली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताची चांद्रयान-3 मोहिम यशस्वी ठरली होती. चंद्रावर यशस्वीरित्या यान उतरवणारा भारत जगातील चौथा देश ठरला होता. असे विक्रम नावावर असणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोला 100 व्या मोहिमेमध्ये धक्का बसला आहे. 29 जानेवारीला इस्रोने NVS-02 उपग्रह (NVS 02 Satellite) लॉन्च केला होता. GSLV-Mk 2 रॉकेटद्वारे या उपग्रहाच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असले, तरी NVS-02 उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यात अपयश आले आहे.

(हेही वाचा – Union Budget 2025 : आयकरात मोठी सूट देतांना अधिकाऱ्यांना कसे राजी केले ?; अर्थमंत्री म्हणातात…)

इस्रोकडून रविवारी ही माहिती देण्यात आली. भारत (INDIA) स्वत:ची नेव्हिगेशन प्रणाली विकसित करत आहे. त्यासाठी एनवीएस-02 उपग्रह खूप महत्त्वाचा होता. श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील अवकाश तळावरून या उपग्रहाचे लॉन्चिंग झाले होते. इस्रोची ही 100 वी मोहिम होती.

उपग्रहाची कक्षा वाढवण्याची जी प्रक्रिया असते, त्यात अपयश आले. एनवीएस-02 उपग्रहातील थ्रस्टर्स प्रज्वलित होण्यासाठी आवश्यक असेलले ऑक्सीडायजरचे वाल्वच उघडले नाहीत, त्यामुळे उपग्रहाला अपेक्षित कक्षेत स्थापित करता आले नाही, अशी माहिती इस्रोने दिली आहे.

सध्या एनवीएस-02 उपग्रह पृथ्वीभोवती GTO कक्षेत भ्रमण करत आहे. नेव्हिगेशन सिस्टिमसाठी ही कक्षा उपयोगाची नाही. उपग्रहाची बाकीची सिस्टिम व्यवस्थित काम करत आहे. त्याचे भ्रमण सुरु आहे. नेव्हिगेशनसाठी उपग्रहाचा वापर करण्यासाठी पर्यायी मिशन रणनितीवर काम सुरु आहे.

GSLV रॉकेटने उपग्रहाला (NVS 02 Satellite) GTO कक्षेत स्थापित केल्यानंतर त्यावरील सौर पॅनलने आपले काम व्यवस्थित सुरु केले. सामान्य ऊर्जा निर्मिती झाली. ग्राऊंड स्टेशनसोबत कम्युनिकेशन सुरळीत आहे. जीएसएलव्ही द्वारे लॉन्चिंग यशस्वी ठरले. अत्यंत अचूकतेने कक्षेत स्थापित करण्याबरोबर सर्व टप्प्यांवर योग्य पद्धतीने काम झाले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.