-
ऋजुता लुकतुके
आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपदाच्या फॉरमॅटमध्ये नवीन हंगामात मोठा बदल होऊ शकतो. जून महिन्यात लॉर्डवरील अंतिम फेरी संपली की, भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासून नवीन हंगामाची सुरुवात होणार आहे. आणि तेव्हापासूनच हा बदल दिसू शकतो. शिफारस अशी आहे की, कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही द्विस्तरीय असावी. आणि त्यात भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड हे देश अव्वल स्तरात असावेत आणि बाकीचे देश हे दुसऱ्या स्तरात असावेत. या दोन स्तरांतील संघांमध्ये नियमितपणे मालिका खेळवण्यात याव्यात. आणि या मालिका होतात की नाही, यावर आयसीसीचं लक्ष असावं, असा हा प्रस्ताव आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा- NVS 02 Satellite अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यास अपयश; ISRO ने सांगितले कारण…)
कसोटी मालिका रंगतदार होत नसल्यामुळे आणि द्विपक्षीय मालिका फारशा होत नसल्यामुळे कसोटीची रंगत कमी होत असल्याचं निरीक्षण अनेकांनी मांडलं आहे. त्यामुळे पूर्ण सदस्यांनी नाराजीही व्यक्त केली आहे. यंदा दक्षिण आफ्रिकन संघाने अंतिम फेरी गाठली आहे. पण, त्यांनी ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड या कसोटीतील अव्वल संघांशी परदेशात एकही मालिका खेळलेली नाही. ऑस्ट्रेलियाबरोबर त्यांची मालिकाच झाली नाही. आणि भारताबरोबर २ कसोटी सामने मायदेशात झाले. शिवाय न्यूझीलंड दौऱ्यात या संघाने एसएटी-२० स्पर्धेचं कारण देत आपला तिसऱ्या दर्जाचा संघ पाठवला होता. असं असतानाही दुय्यम संघांविरुद्ध विजय मिळवत संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. (ICC Test Championship)
त्यामुळे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फॉरमॅटवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कसोटी मालिकांचा दर्जाही घसरताना दिसत आहे. अशावेळी टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या रेट्यात कसोटीचं महत्त्व टिकून राहावं असा आयसीसीचा प्रयत्न असेल. आणि त्यासाठी नवीन अध्यक्ष जय शाह यांनीही पुढाकार घेतला आहे. इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रिचर्ड थॉमसन यांनी काही दिवसांपूर्वी याविषयी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्याबरोबर बैठक केली आहे. (ICC Test Championship)
(हेही वाचा- Donald Trump 7 दिवसांत बोलले 81,235 शब्द ; व्हाईट हाऊस जास्तीचे स्टेनोग्राफर भरती करण्याच्या विचारात)
थॉम्पसन यांनी टेलिग्राफ स्पोर्टला सांगितले की, ‘सध्याची रचना जशी असायला हवी तशी काम करत नाही, हे पूर्णपणे समजले आहे आणि आपल्याला आता स्पर्धसाठी नवीन काही गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्यावर काम करण्यासाठी पाच महिने आहेत आणि भविष्यातील रचना कशी असावी ते पाहू.’ भारताच्या इंग्लंड दौऱ्यापासूनच हा बदल अस्तित्वात येऊ शकतो. (ICC Test Championship)
आतापर्यंत कसोटी अजिंक्यपदाचे दोन हंगाम झाले आहेत. आणि यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावलं आहे. भारतीय संघ दोन्ही वेळा उपविजेता ठरला होता. यंदा २६ जूनला लॉर्ड्स इथं ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ आमने सामने येणार आहेत. (ICC Test Championship)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community