अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांना ब्रेन हॅमरेज; प्रकृती चिंताजनक

79
अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांना ब्रेन हॅमरेज; प्रकृती चिंताजनक
अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांना ब्रेन हॅमरेज; प्रकृती चिंताजनक

अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराचे (Ayodhya Ram Temple) मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास (Acharya Satyendra Das) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) मध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना ब्रेन हॅमरेज झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी रात्री उशिरा आचार्य सत्येंद्र दास यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना प्रथम अयोध्येतील सिटी न्यूरो केअर रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती पाहता डॉक्टरांनी त्यांना लखनऊला (Lucknow) रेफर करण्याचा निर्णय घेतला. (Acharya Satyendra Das)

हेही वाचा-NVS 02 Satellite अपेक्षित कक्षेत स्थिर करण्यास अपयश; ISRO ने सांगितले कारण…

आचार्य सत्येंद्र दास यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. आचार्य सत्येंद्र दास यांच्यासह रामजन्मभूमी मंदिराचे सहायक पुजारी प्रदीप दास उपस्थित होते. त्यांनी सांगितले की आचार्यजींची तब्येत अचानक बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना तात्काळ लखनऊला नेण्याचा सल्ला दिला. (Acharya Satyendra Das)

हेही वाचा-Donald Trump 7 दिवसांत बोलले 81,235 शब्द ; व्हाईट हाऊस जास्तीचे स्टेनोग्राफर भरती करण्याच्या विचारात

आचार्य सत्येंद्र दास लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मंदिरातील पुजारी आणि भक्तांनी हवन आणि प्रार्थना सुरू केल्या आहेत. मंदिरातील पूजा आणि इतर धार्मिक विधी पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे रामजन्मभूमी मंदिर प्रशासनाने म्हटले आहे. मंदिराचे सर्व कामकाज सहाय्यक पुजाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरळीतपणे सुरू आहे. (Acharya Satyendra Das)

कोण आहेत सत्येंद्र दास ?
रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास हे संत कबीरनगर येथील रहिवासी आहेत. लहानपणी ते वडिलांसोबत अयोध्येत अभिराम दासजींच्या घरी येत असत. अभिराम दास यांनी 1949 मध्ये रामजन्मभूमीच्या गर्भगृहात मूर्ती ठेवल्या होत्या. ८ फेब्रुवारी १९५८ रोजी अयोध्येत आले. कुटुंबात दोन भाऊ आणि एक बहीण होती. जेव्हा त्यांच्या वडिलांना समजले की त्यांना साधू बनायचे आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. एक मुलगा घरी राहणार आणि एक देवाच्या सेवेला जाणार असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सत्येंद्र दास अयोध्येत आले. आता कुटुंबात एक भाऊ आहे. बहिणीचा मृत्यू झाला आहे. (Acharya Satyendra Das)

हेही वाचा-पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ ठरला Maharashtra Kesari

बाबरी विध्वंस झाला तेव्हा सत्येंद्र दास तिथे होते. सकाळचे 11 वाजले होते. स्टेज उभारला होता. लाऊड स्पीकर लावण्यात आला होता. पुजाऱ्याने रामलल्लाला भोजन अर्पण करावे आणि पडदा बंद करावा, असे नेत्यांनी सांगितले. सत्येंद्र दास यांनी जेवण दिले आणि पडदा बंद केला. यानंतर घोषणाबाजी सुरू झाली. कारसेवकांनी बॅरिकेड्स तोडून वादग्रस्त वास्तू गाठून ते पाडण्यास सुरुवात केली. दरम्यान, सत्येंद्र दास यांनी रामलल्लाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून त्यांना वाचवण्यास सुरुवात केली. (Acharya Satyendra Das)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.