Maharashtra Kesari Kusti : शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई

85
Maharashtra Kesari Kusti : शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई
Maharashtra Kesari Kusti : शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई
  • ऋजुता लुकतुके 

यंदाची महाराष्ट्रकुस्ती स्पर्धा अखेर पृथ्वीराज मोहोळच्या विजयाने आणि पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे झालेल्या गोंधळानंतर संपली आहे. मोहोळला चांदीची गदा मिळाली. तर त्याचे उपान्त्य आणि अंतिम फेरीतील प्रतिस्पर्धी शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड यांच्यावर पंचांशी भर मैदानात वाद घातल्यामुळे निलंबनाची कारवाई झाली आहे. दोघांना प्रत्येकी ३ वर्षं कुठलीही स्पर्धा खेळता येणार नाही. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं हा निर्णय जाहीर केला आहे. (Maharashtra Kesari Kusti)

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभूतपूर्व गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. उपांत्य सामन्यात पहिलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली आणि शिवीगाळ केली. तर अंतिम सामन्यात पहिलवान महेंद्र गायकवाड याने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त करत मैदान सोडलं. त्यावेळी त्याने पंचांना शिवीगाळही केली. यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेची एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये या दोनही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. (Maharashtra Kesari Kusti)

(हेही वाचा- Donald Trump 7 दिवसांत बोलले 81,235 शब्द ; व्हाईट हाऊस जास्तीचे स्टेनोग्राफर भरती करण्याच्या विचारात)

राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास कदम म्हणाले की, “पंचांनी जो निर्णय दिला होता त्याच्याविरोधात पहिलवानांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी खिलाडूवृत्तीने खेळायला पाहिजे होतं. त्यांनी पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे हे चुकीचं कृत्य केलं. त्यामुळेच शिवराज राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाडने पंचांसोबत वाद केला आणि शिवीगाळही केली. हे एका खेळाडूला शोभणारं नाही. त्यालाही तीन वर्षे कोणत्याही स्पर्धेमध्ये खेळता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे.” (Maharashtra Kesari Kusti)

मॅट विभागामधून महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा  सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्तीचा सामना सुरू असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते. मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ  मारल्याचा प्रकार घडला होता. यावेळी मोठा गोंधळ झाल्याचं दिसून आलं.  आपले खांदे जमिनीला टेकलेले नव्हते, असं राक्षेचं म्हणणं होतं. (Maharashtra Kesari Kusti)

(हेही वाचा- Maharashtra Kesari Kusti : वादांनी रंगलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ विजेता )

दुसरीकडे, महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात पृथ्वीराज मोहोळला दुसरा गुण दिल्यानंतर त्याविरोधात महेंद्र गायकवाडने पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केल्याचा आरोप पंचांनी केला. तसेच महेंद्र गायकवाडने मैदान सोडलं आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. (Maharashtra Kesari Kusti)

शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांनी केलेल्या या कृत्याचा सर्व पंचांनी निषेध व्यक्त केला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर बैठक घेतली. त्यानंतर राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत या दोन्ही पैलवानांवर तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. (Maharashtra Kesari Kusti)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.