-
ऋजुता लुकतुके
दिल्ली विरुद्ध रेल्वे रणजी सामन्यात विराट कोहली ६ धावा करून बाद झाला. रेल्वेचा तेज गोलंदाज हिमांशू सांगवानने एका आत स्विंग झालेल्या चेंडूवर विराटचा त्रिफळा उडवला. विराटची उजवी यष्टी या चेंडूने उखडून टाकली. या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात चहापानापूर्वी हा बळी हिमांशूला मिळाला. पण, त्यानंतर दिल्लीने पहिल्या डावांत ३४४ अशी समाधानकारक धावसंख्या उभारली. आणि रेल्वेला दुसऱ्या डावांत १२० धावांतच गुंडाळून हा सामनाही जिंकला. तिसऱ्या दिवशी हा सामना संपल्यानंतर हिमांशूने दिल्ली ड्रेसिंग रुममध्ये विराट कोहलीची भेट घेतली. आणि त्याच्याकडून एक भेट मागितली. विराटला बाद केलेल्या चेंडूवर हिमांशूला विराटचा ऑटोग्राफ हवा होता. विराटनेही आनंदाने हिमांशूला ही भेट देऊ केली.(Virat Kohli)
(हेही वाचा- बौद्धिक संपदा चोरी हा गुन्हाच; Supreme Court चा निर्वाळा)
हिमांशूने तो व्हीडिओ सामना संपल्यानंतर ट्विट केला आहे. माझ्यासाठी तो क्षण म्हणजे फॅन मोमेंट होती, असं हिमांशू यात म्हणतो. १२ वर्षांनंतर रणजी स्पर्धा खेळणारा विराट फक्त १६ चेंडू मैदानावर टिकला. आणि ६ धावा करून बाद झाला. आधीच्याच चेंडूवर विराटने हिमांशूला एक स्ट्रेट ड्राईव्हचा फटका लगावत चौकार वसूल केला होता. आणि पुढच्याच चेंडूवर त्याचा त्रिफळा उडाला. (Virat Kohli)
View this post on Instagram
हिमांशू सांगवान हा भारतीय रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून काम करतो. आणि प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तो रेल्वेकडून चांगलाच स्थिरावला आहे. यापूर्वी अजिंक्य रहाणे, रिंकू सिंग, पृथ्वी शॉ, कृणाल पांड्या अशा आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही त्याने चकवलं आहे. दिल्लीत एमआरएफ फाऊंडेशनतर्फे झालेल्या शिबिरात त्याला ग्लेन मॅग्राचं मार्गदर्शनही लाभलं आहे. ‘विराटला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. मी रणजी सामन्यासाठी इतकी गर्दी कधीच पाहिली नव्हती. अशावेळी मोठ्या गर्दीसमोर मी विराटला बाद करू शकलो, याचा मला अभिमान आहे. गोलंदाजाला चौकार ठोकलेला अजिबात आवडत नाही. त्याने आधीच्या चेंडूवर चौकार वसूल केला होता. त्याचा वचपा मी काढू शकलो, याचा आनंद वाटला,’ असं हिमांशूने बोलून दाखवलं होतं. (Virat Kohli)
(हेही वाचा- ICC Test Championship : आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा फॉरमॅट पुढील हंगामात बदलणार)
‘अशी भेट ही देवाचीच योजना होती,’ असं या पोस्टवर हिमांशू सांगवानने म्हटलं आहे. (Virat Kohli)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community