CSMT स्थानकावर लवकरच १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर मशीन बसवणार

79
CSMT स्थानकावर लवकरच १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर मशीन बसवणार
CSMT स्थानकावर लवकरच १५० हायटेक बॅगेज, बॉडी स्कॅनर मशीन बसवणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) वर गेल्या काही दिवसांपासून स्थानकावरील मशिन्स बिघडल्याने सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हे लक्षात घेता आता सीएसएमटीवर लवकरच १५० हायटेक बॅगेज, तसेच बॉडी स्कॅनिंग मशिन (baggage body scanner ) बसविण्यात येणार आहेत. यासाठी मध्य रेल्वेने (Central Railway) निविदा काढली आहे. (CSMT)

हेही वाचा-Accident News : कर्मचारी गोव्यावरून सहलीहून परतताना भीषण अपघात; 1 ठार 30 जखमी

सीएसएमटी हे युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. या टर्मिनसवर दररोज सुमारे ११.५ लाख प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने १५० मशिनसाठी निविदा काढल्या आहेत. त्यानुसार ७ बॅगेज स्कॅन मशिन आणि १४३ बॉडी स्कॅनिंग मशिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. (CSMT)

हेही वाचा-नागपुरातील मैदानांच्या विकासासाठी राज्य शासनाकडून १५० कोटी देणार ; CM Devendra Fadnavis यांची घोषणा

नवीन हायटेक मशिन (Hi-tech machine) सीएसएमटी मध्ये लावण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. बॅगेज स्कॅनरमध्ये ३२ प्रकारच्या वस्तू ओळखण्याची क्षमता आहे. त्यात रेल्वे प्रवासात अतिधोकादायक ठरणाऱ्या वस्तूंचाही समावेश आहे.लांब पल्ल्याच्या प्रवाशांकडे भरपूर सामान असते. त्यात अनेक धोकादायक वस्तू असू शकतात. त्यामुळे अशा प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. (CSMT)

हेही वाचा-Donald Trump 7 दिवसांत बोलले 81,235 शब्द ; व्हाईट हाऊस जास्तीचे स्टेनोग्राफर भरती करण्याच्या विचारात

सीएसएमटी स्थानकात प्रवेश करण्यासाठी १०० पेक्षा जास्त एंट्री पॉइंट आहेत. यामुळे, प्रवाशांच्या हालचालींवर बंधने घालता येत नाहीत, परंतु मशिनद्वारे त्यांच्यावर निश्चितपणे लक्ष ठेवले जाऊ शकते. सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबरच यंत्रांच्या मदतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे अधिकारी म्हणाले. तसेच प्रवाशांवर लक्ष ठेवण्यासाठी हाय एंड मशिन्स महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. (CSMT)

हेही वाचा-Mahakumbh 2025: महाकुंभमेळ्यातील तिसऱ्या अमृतस्नानाला सुरूवात ; संगमावर पवित्र स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी

लगेज स्कॅनिंग मशिन ३२ वेगवेगळ्या वस्तू ओळखण्यास सक्षम असतील. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वे विशेष प्रयत्न करत आहे. हाही त्याचाच एक भाग आहे, असे स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे यांनी सांगितले आहे. (CSMT)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.