-
ऋजुता लुकतुके
डेव्हिस चषक या सांघिक टेनिस स्पर्धेत भारताने टोगोचा ३-० असा पराभव करत जागतिक गटात पुन्हा एकदा स्थान मिळवलं आहे. पहिल्या दिवशी एकेरीतच भारताने दोन्ही सामने जिंकून २-० अशी आघाडी घेतली होती. आता बालाजी आणि रित्विक यांना दुहेरी जिंकून थेट विजय साध्य करायचा होता. आणि त्यांनी ते करून दाखवलं. एमलापा टिंगाओ आणि इसाक पाडिओ या टोगोच्या जोडीचा त्यांनी ६-२ आणि ६-१ असा सरळ सेटमध्येच पराभव केला. जेमतेम ५७ मिनिटं हा सामना चालला. या विजयाबरोबरच ३-० अशा आघाडीसह भारताने आगेकूच निश्चित केली आहे. (Davis Cup 2025)
(हेही वाचा- Maharashtra Kesari Kusti : शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाडवर निलंबनाची कारवाई)
दुहेरीत टोगोचा थॉमस सेतोजी हा अव्वल खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी एमलापा टिंगाओ खेळला. आणि टोगोचा संघ त्यामुळे काहीसा दुबळा झाला. याचा फायदा भारतीय संघाने मिळवला. खासकरून बालाजीच्या सर्व्हिसवर भारताने अख्ख्या सामन्यात फक्त एक गुण गमावला. उलट टोगोच्या संघाची सर्व्हिस भारतीयांनी दोन्ही सेटमध्ये तिसऱ्या गेमध्येच भेदली. आणि मिळालेलं वर्चस्व त्यांनी हातचं जाऊ दिलं नाही. (Davis Cup 2025)
Historic Win For INDIA🇮🇳#TeamIndia defeated Togo by 3-0 in #DavisCup World Group 1 playoffs 💥 pic.twitter.com/DTgiSyWZLr
— Doordarshan Sports (@ddsportschannel) February 2, 2025
भारताकडून रित्विक बोमिपल्लीने पदार्पण करताना चांगली कामगिरी केली. ३-० अशा आघाडीनंतर भारताने चौथा सामना खेळण्याची संधी युवा करण शर्माला दिली. आणि त्यानेही हा सामना जिंकत भारताला ४-० असा विजय मिळवून दिला. हा विजय भारतासाठी महत्त्वाचा होता. कारण, या मुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक गटात स्थान मिळवलं आहे. सुमित नागल, रामकुमार रामनाथन हे आघाडीचे भारतीय खेळाडू खेळत नसताना भारताने ही कागमरी करून दाखवली आहे हे विशेष. (Davis Cup 2025)
(हेही वाचा- अयोध्या राम मंदिराचे मुख्य पुजारी Acharya Satyendra Das यांना ब्रेन हॅमरेज; प्रकृती चिंताजनक)
जागतिक गटातील स्पर्धा व ड्रॉ सप्टेंबर महिन्यात बाहेर येतील. (Davis Cup 2025)