आसाम (Assam) पोलिसांनी राज्यातील सुमारे १७० बिघा क्षेत्रातील अफूची (poppy) शेती नष्ट केली आहे. या अफूची किंमत २७ कोटी रुपये होती. ही माहिती ग्वालपाडा पोलिस आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी दिली आहे. त्याचवेळी आसाम रायफल्सने स्थानिक पोलिसांसह मणिपूरमधील भारत-म्यानमार सीमेवर सुमारे ३० एकरवरील (सुमारे ५० बिघा) बेकायदेशी अफूची लागवड नष्ट केली आहे.
( हेही वाचा : Right to Die with dignity : सन्मानाने मरणाचा कायदा लागू करणारे पहिलेच राज्य ठरले कर्नाटक ; नेमका कायदा आहे तरी काय?)
आसामच्या (Assam) मुख्यमंत्र्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले, “प्रिय स्थानिक पाब्लो एस्कोबार्स (Pablo Escobar) (कोलंबियाचे कुख्यात ड्रग माफिया), तुमची योजना उडता आसाम पार्टी खराब केल्याबद्दल माफ करा! कारण ग्वालपाडा पोलिसांनी जानेवारीमध्ये चार भागात २७.७० कोटी रुपयांची १७० बिघा अफूची लागवड नष्ट केली होती. म्हणून पुढच्यावेळी जेव्हा अंमली पदार्थाचा विचार कराल तेव्हा आसाम पोलिसांची ही कारवाई आठवा”, असे ही बिस्वा म्हणाले. (poppy)
दरम्यान, ग्वालपारा (Goalpara) पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “चुनरी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सीतलमारी चार येथे १०० बिघा जमिनीवर अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम सुरू ठेवत एएसपी (मुख्यालय) जीएलपी आणि ओसी एलपीआर पीएस ग्वालपारा यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेकायदेशीर अफूची लागवड उध्वस्त केली. पोलिस पथकाने सीओ लखीपूर (Lakhipur), उत्पादन शुल्क निरीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ते नष्ट केले. (Assam)
गेल्या आठवड्यात दि. ३० जानेवारी २०२५ रोजी ग्वालपाडा पोलिसांनी सोनारी सारमधील ४० बिघा क्षेत्रातील अफूची शेती नष्ट केली होती. गुवाहाटी प्रशासनाने २०२१ आणि २०२३ मध्ये शियालमारीमध्ये मोठ्या प्रमाणात अफूची लागवड नष्ट केली होती. सार प्रदेशात अफूची लागवड पहिल्यांदा २०१० मध्ये दरंग जिल्ह्यातील मागुरमारी सार येथे नोंदवली गेली.(Assam)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community