राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांचा पलटवार; म्हणाले, देशाची प्रतिमा…

85

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर (S. Jaishankar) यांच्या अमेरिका दौऱ्यावर भाष्य केले. त्यांच्या वक्तव्यावर परराष्ट्र मंत्र्यांनी (Minister of Foreign Affairs) प्रत्युत्तर देत एक्सवर लिहिले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी डिसेंबर 2024 मध्ये माझ्या अमेरिका भेटीबद्दल जाणूनबुजून खोटे बोलले. या आरोपांवर आता स्वतः जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (S. Jaishankar)

राहुल गांधींवर निशाणा साधत परराष्ट्र मंत्र्यांनी (S. Jaishankar Rahul Gandhi) एक्स पोस्टमध्ये लिहिले की, ‘विरोधी पक्षनेते राहुल गांधी माझ्या डिसेंबर 2024 मधील अमेरिका दौऱ्याबाबत जाणूनबुजून खोटे बोलले. मी बायडेन प्रशासनाच्या परराष्ट्र सचिव आणि NSA यांना भेटायला गेलो होतो. आमच्या कॉन्सुल जनरलच्या बैठकीच्या अध्यक्षतेसाठी ही गेलो होतो. पंतप्रधानांच्या निमंत्रणाबाबत चर्चा झाली नाही. आपले पंतप्रधान अशा कार्यक्रमांना सहसा उपस्थित राहत नाहीत, हे सर्वज्ञात आहे. राहुल गांधी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी देशाची प्रतिमा मलीन करत आहेत,’ असा आरोप जयशंकर यांनी केला.

(हेही वाचा – Indian Railway च्या विद्युतीकरणाला १०० वर्षे पूर्ण; कसा होता प्रवास, जाणून घ्या..)

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) निशाणा साधला. आपल्या देशात चांगली उत्पादन व्यवस्था असती तर परराष्ट्रमंत्र्यांना इतक्या वेळा अमेरिकेला जावे लागले नसते आणि आपल्या पंतप्रधानांना डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला बोलवण्यासाठी विनंती करावी लागली नसती. परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेत जाऊन प्लीज आमच्या पंतप्रधानांना बोलवा, असे म्हणायला लागले नसते, असे विधान राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी टीका करत असताना पंतप्रधान मोदी ही लोकसभेत उपस्थित होते.

(हेही वाचा – Flower Festival : दीड लाख मुंबईकरांनी जाणून घेतली झाडाफुलांची माहिती; महापालिकेच्या पुष्पोत्सवाची मुंबईकरांना भुरळ)

राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने आक्षेप व्यक्त केला 

दुसरीकडे, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी राहुल गांधींच्या विधानावर तीव्र आक्षेप व्यक्त करत म्हटले की, ‘विरोधी पक्षाच्या नेत्याने कोणतेही तथ्य आणि पुराव्याशिवाय असे गंभीर आरोप करू नयेत. हा दोन देशांमधील संबंधांचा विषय आहे. अशा परिस्थितीत चुकीचे आरोप करू नयेत. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच चीनच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या शपथविधीसाठी आमंत्रित केले होते, परंतु या शपथविधी सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.