CM Devendra Fadnavis यांना वर्षा निवासस्थानी जाण्यास भीती वाटते का?

54
CM Devendra Fadnavis यांना वर्षा निवासस्थानी जाण्यास भीती वाटते का?
  • खास प्रतिनिधी 

राज्यात महायुती सरकार स्थापन होऊन ४ फेब्रुवारीला दोन महीने पूर्ण होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी अद्याप आपला मुक्काम ‘सागर’वरून ‘वर्षा’ या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हलवला नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी यावरून राजकारण करण्याचा प्रयत्न केला आणि फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर जाण्यास भीती वाटत आहे का? असा प्रश्न उपस्थित करून गैरसमज पसारवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : दिल्ली निवडणुकीमध्ये भाजपाला मराठी मतदारांचे झुकते माप)

राजकारणात अंधश्रद्धा

संजय राऊत यांनी ३ फेब्रुवारी २०२५ ला सकाळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राऊत म्हणाले, “महाराष्ट्र एक असं राज्य आहे जे कायम अंधश्रद्धेविरोधात लढत आला आहे. इथे अंधश्रद्धा चालत नाही. सामाजिक सुधारणांबाबतीत महाराष्ट्र कायम एक पाऊल पुढे राहिला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात अंधश्रद्धा आली.”

(हेही वाचा – महाराष्ट्रात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणणार; मंत्री Nitesh Rane यांची घोषणा)

भीती कसली

राऊत पुढे म्हणाले, “काल माझा प्रश्न एवढाच होता की देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) वर्षा बंगल्यावर राहायला का जात नाही. याचं उत्तर रामदास कदम, एकनाथ शिंदे, भाजपच्या प्रवक्त्त्यांनी द्यावं. देवेंद्र फडणवीस त्यांचं कुटुंब तिथे राहायला का जात नाही? तिथे काही मिरच्या आहेत, लिंबू आहेत, असं काही मी म्हटलेलं नाही. मी फक्त एवढंच विचारलं की तुम्हाला कसली भिती वाटतेय. तिथे असं काय घडलंय. की घडवलंय हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा व संशोधनाचा विषय आहे. लोकं वर्षावर जाण्यासाठी धडपडतात. कधीतरी मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री बनून. मी प्रथमच पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही बंगल्यावर, आमच्या अमृता वहिणींनी जावसं वाटत नाही. अनामिक भितीमुळे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान बदलायचे सुरू आहे, वर्षा बंगला पाडून नव्याने बांधायचे सुरू आहे, असं काय घडलंय तिथे. भिती कसली आहे”, असे सांगत राऊत यांनी फडणवीस यांच्याबद्दल संभ्रम निर्माण केला.

(हेही वाचा – Flower Festival : दीड लाख मुंबईकरांनी जाणून घेतली झाडाफुलांची माहिती; महापालिकेच्या पुष्पोत्सवाची मुंबईकरांना भुरळ)

‘वर्षा’ निवासस्थान सोडले

मात्र, एकनाथ शिंदे यांनी गेल्या १५-२० दिवसांपूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थान सोडले असून बंगल्याचा ताबा मुख्यमंत्री कार्यालयाला दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने बंगल्यात काही दुरुस्ती-डागडुजी, रंगरंगोटी करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे समजते.

(हेही वाचा – Indian Railway च्या विद्युतीकरणाला १०० वर्षे पूर्ण; कसा होता प्रवास, जाणून घ्या..)

ठाकरेंचा गृहप्रवेश उशिराच

संजय राऊत यांना पत्रकारांनी उलट प्रश्न केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील वर्षा निवासस्थानी उशिरा गृहप्रवेश केला होता यांची आठवण करून दिली. त्यावर राऊत यांनी ही मान्य केले आणि सांगितले की, “नवीन मुख्यमंत्री होतो त्याआधी थोडी रंगरंगोटी होते, आपण धार्मिक लोकं आहोत, सत्यनारायण पूजा, वास्तु शांती करतो, त्यासाठी जेवढा वेळ लागेल तेवढाच उद्धव ठाकरे यांनी घेतला.” हे सांगत असताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनाही त्याच कारणांसाठी थोडा वेळ लागू शकतो, हे सांगायला विसरले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.