Ministry Gate Entry: मंत्रालय प्रवेशास नवीन प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांचे हाल; १०० जणांना बसला लेटमार्कचा फटका

65

मुंबई प्रतिनिधी:

राज्य सरकारने मंत्रालय प्रवेशासाठी नवीन एफआरएस (Face Recognition System) प्रणाली लागू केली आहे. मात्र, या निर्णयापूर्वी शासनाने कर्मचाऱ्यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक होते. तसेच, या प्रणालीसंदर्भात योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे होते. मात्र, तसे न झाल्यामुळे मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी, सोमवारी जवळपास १०० कर्मचाऱ्यांना उशिरा हजेरीची नोंद (latemark) बसली. (Ministry Gate Entry)

(हेही वाचा – बनावट कागदपत्रांच्या आधारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांवर गुन्हा दाखल; Aditi Tatkare यांची माहिती)

मंत्रालय प्रवेशद्वारावर तणावाचे वातावरण
महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) कोसळल्यानंतर महायुती सरकार स्थापन झाले. याआधी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामान्य नागरिकांना थेट मंत्रालय प्रवेश दिला होता. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव नवीन एफआरएस प्रणाली लागू केली आहे. त्यामुळे मंत्रालयात आता मुक्त संचार शक्य नाही.

याच प्रणालीमुळे सोमवारी मंत्रालय प्रवेशद्वारावर (Ministry Staff Lettermark) मोठा गोंधळ उडाला. एका मोठ्या मंत्र्यांचे ओएसडी जे फेस रिडिंग प्रक्रिया पूर्ण करूनही मंत्रालयात प्रवेश करत होते, त्यांना अचानक मशीन बिघाड झाल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांना आपण ओएसडी (OSD) असल्याचे सांगितले, मात्र पोलिसांनी त्यांना सरळ ‘जा, पास काढा’ असा सल्ला दिला. यामुळे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवेशासाठी रांगेत उभे राहावे लागले आणि मंत्रालय प्रवेशद्वारावर पोलिसांशी शाब्दिक चकमक उडाली.

(हेही वाचा – 2020 Delhi चित्रपट विरुद्धच्या शर्जील इमामच्या याचिकेवर सुनावणी करण्यास Delhi High Court चा नकार)

अन्न व औषध प्रशासन मंत्री पुढाकार घेणार
मंत्रालयात अनेक ज्येष्ठ नागरिक भेटीसाठी येतात. त्यांना पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या किंवा औषधं आणण्यास परवानगी मिळावी का, याबाबत चर्चा करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ (Minister Narahari Zirawal) पुढाकार घेणार आहेत. लवकरच ते संबंधित विभागाच्या मंत्र्यांसोबत तसेच सुरक्षा विभागासोबत चर्चा करून काही तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.