कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि त्याबद्दल लोकांना संवेदनशील बनवणे या उद्देशाने दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) पाळला जातो. कर्करोगाची ओळख पटविण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि पीडितांना व त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी हा दिवस विशेष योगदान देतो.
दिवसेंदिव कर्करोगाचा धोका वाढत चालला आहे. अनियमित खाण्याच्या सवयी, प्रक्रिया केलेले आणि जंक फूडचे सेवन, प्रदूषण आणि जीवनशैली यामुळे गेल्या दशकात केवळ भारतातच नाही तर जगभरात कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या अहवालानुसार २०२३ मध्ये भारतात कर्करोगाचे १४,९६,९७२ रुग्ण नोंदवले गेले आहेत. असा अंदाज आहे की २०४० पर्यंत भारतात कर्करोगाचे रुग्ण दुप्पट होतील.
४ फेब्रुवारी २००० रोजी पॅरिस येथे झालेल्या नवीन सहस्राब्दीसाठी जागतिक कर्करोग शिखर परिषदेत जागतिक कर्करोग दिनाची (World Cancer Day) सुरुवात करण्यात आली. सध्या, जागतिक कर्करोग दिनाचे नेतृत्व युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल (UICC) द्वारे केले जाते. या दिवसाचा मुख्य उद्देश कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना त्याबद्दल संवेदनशील बनवणे आहे.
(हेही वाचा देशभरात ‘Bangladeshi घुसखोर हाकला, देश वाचवा’ ही मोहीम राबवणार; हिंदू जनजागृती समितीची घोषणा)
खरं पाहता जागतिक कर्करोग दिन साजरा करण्याची कल्पना १९३३ मध्ये स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे UICC (युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल) च्या नेतृत्वाखाली आणि इतर विविध प्रसिद्ध कर्करोग संस्था, संशोधन संस्था, उपचार केंद्रे आणि रुग्ण गटांच्या सहकार्याने सुरू झाली होती.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त, (World Cancer Day) जर लवकर निदान झाले तर कर्करोग १०० टक्के बरा होऊ शकतो या वस्तुस्थितीबद्दल जागरूकता निर्माण केली जाते. दरवर्षी हा दिवस पाळताना एक थीम निश्चित केली जाते. २०२४ च्या जागतिक कर्करोग दिनाची थीम ‘क्लोजिंग द केअर गॅप’ होती. कर्करोग उपचार आणि काळजीमधील असमानता अधोरेखित करणे आणि दूर करणे यावर या थीमचा भर होता. या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये, जागतिक कर्करोग दिनाची थीम ‘युनायटेड बाय युनिक’ अशी आहे, जी २०२५ ते २०२७ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे. कर्करोगाविरुद्धच्या लढाईत रुग्ण-केंद्रित वैद्यकीय सेवेवर भर यानिमित्त दिला जाणार आहे.
Join Our WhatsApp Community