Nashik च्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन?

41
Nashik च्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन?
Nashik च्या पालकमंत्री पदी गिरीश महाजन?

राज्यातील महायुती सरकारमध्ये नाशिक (Nashik) पालकमंत्री पदावरून वाद सुरू झाला असला तरी नाशिकचे (Nashik) पालकमंत्री पद भाजपा आपल्याकडेच ठेवणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तिय समजले जाणारे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नाशिक (Nashik) पालकमंत्री पदावर पुन्हा वर्णी लागणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविण्यात येत आहे.

(हेही वाचा – Union Budget 2025 : मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला दिलासा देणारा अर्थसंकल्प!)

परदेशातूनच नियुक्तीला स्थगिती

२६ जानेवारीपूर्वी दावोस दौऱ्यावर जाण्याआधी १० जानेवारी २०२५ या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पालकमंत्र्यांच्या नावांची घोषणा केली. मात्र त्यानंतर रायगड आणि नाशिकच्या (Nashik) पालकमंत्री पदावरून शिवसेना आमदारांनी आक्षेप नोंदवला. रायगड भागात शिवसेनेकडून तटकरे यांच्या नियुक्तीविरोधात आंदोलनही झाले. त्यामुळे फडणवीस यांनी दावोस येथूनच वादग्रस्त पालकमंत्री पदांच्या नियुक्तीला स्थगिती दिली. त्यात रायगडच्या आदिती तटकरे आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांचा समावेश होता.

(हेही वाचा – Dollar च्या तुलनेत रुपया पहिल्यांदाच ८७ रुपयावर पोहचला)

कुंभमेळा अनुभव

या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्री (Guardian Minister) पदाचा वाद अद्याप मिटला नाही. मात्र नाशिकबाबत फडणवीस ठाम असून महाजन यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात येईल, अशी शक्यता अधिक आहे. महाजन यांना नाशिक २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभ मेळासाठी सोई-सुविधा आणि व्यवस्था करण्याचा अनुभव असल्याने २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभ मेळासाठी महाजन यांच्या अनुभवाचा उपयोग चांगला होऊ शकतो, यासाठी महाजन यांच्यावरच पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रयगराज येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीत काही जण दगावले. यामुळे महाराष्ट्रात अधिक दक्षता घेण्यासाठी सरकार दरबारी विचारविनिमय सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.