डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष (US President Donald Trump) झाल्यानंतर त्यांनी घेतलेले निर्णय तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या भेटीची जोरदार चर्चा (Donald Trump meets PM Narendra Modi) सुरू आहे. या सगळ्यामध्ये, अशी माहिती मिळाली आहे की, दोन्ही देशाचे नेते १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंग्टनमध्ये भेटणार आहेत, दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असेल. ( PM Narendra Modi)
हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदी फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी वॉशिंग्टन डीसीमध्ये पोहोचतील. ते १४ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेच्या राजधानीत राहतील. त्यांच्या भेटीदरम्यान मोदी अमेरिकन कॉर्पोरेट नेत्यांशी चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
(हेही वाचा – प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या कामांना गती द्या मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे निर्देश)
डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा (Bilateral US tour) असेल. याव्यतिरिक्त, ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर काही आठवड्यांतच वॉशिंग्टन डीसीला (Washington DC) द्विपक्षीय भेटीसाठी जाणारे निवडक परदेशी नेत्यांमध्येगी पंतप्रधान मोदी असतील. ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभानंतर, पंतप्रधान मोदींनी २७ जानेवारी रोजी त्यांच्याशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी व्यापार, ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात भारत-अमेरिका सहकार्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याबाबत चर्चा केली होती.
(हेही वाचा – कृषी क्षेत्रात ‘AI’ चा वापर करण्याचा सरकारचा विचार)
शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) म्हणाले की, भारत आणि अमेरिका दोन्ही देशांमधील भागीदारी आणखी दृढ करण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यासाठी प्रयत्न करत आहेत. तथापि, भेटीच्या नेमक्या तारखा अद्याप निश्चित केलेल्या नाहीत. भारत आणि अमेरिका १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ घेत आहेत, असे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community