National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण

जोनाथनने ऑलिम्पिक विजेत्या सरबज्योतचा पराभव करत सुवर्ण नावावर केलं

55
National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण
National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण
  • ऋजुता लुकतुके

३८ व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत नेमबाजी (National Games Shooting Championship) प्रकारात सिफ्त कौर सामरा (Sift Kaur Samra) आणि जोनाथन एंथोनी (Jonathan Anthony) या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. सिफ्तने ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण जिंकलं. तर कर्नाटकच्या १५ वर्षीय जोनाथनने (Jonathan Anthony) ऑलिम्पिक विजेत्या सरबज्योतला मागे टाकत १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णाची कमाई केली. २३ वर्षीय सिफ्तने ५० मीटर थ्री पोझिशन प्रकारात अंतिम फेरीत ४६१.५ गुणांची कमाई केली. आशियाई स्पर्धेत सुवर्ण विजेत्या सिफ्तसाठी ही कामगिरी मोलाची होती. कारण, गेल्या काही महिन्यात तिचा फॉर्म चांगला नव्हता. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. अशावेळी तिने फॉर्ममध्ये परतल्याचं दाखवून दिलं आहे.

(हेही वाचा – काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरीचा कडेलोट? Nana Patole यांच्या नेतृत्वावर गंडांतर!)

तर कर्नाटकच्या १५ वर्षीय जोनाथनसमोर ऑलिम्पिक पदक विजेत्या सरबज्योतचं आव्हान होतं. पण, शांत आणि एकाग्र राहून जोनाथनने (Jonathan Anthony) त्याच्या गटातील इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंना मागे टाकलं. आणि १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकलं. पंजाबचे रविंदर सिंग आणि गुरप्रीत सिंग या प्रकारात दुसरे आणि तिसरे आले. तर २५ मीटर मिश्र सांघिक प्रकारात ऑलिम्पिक कांस्य जिंकणारा सरबज्योत पाचवा आला. (National Games Shooting Championship)

‘या विजयामुळे मी भारावून गेलो आहे. गटात खूपच मोठी चुरस होती. पण, दिवस माझा होता. मी चांगली कमगिरी करून जिंकू शकलो, याचा मला अभिमान आहे. एवढ्या मोठा स्तरावर मिळवलेल्या विजयामुळे या पदकाचं मोलही माझ्यासाठी मोठं आहे,’ असं जोनाथनने विजेतेपदानंतर बोलून दाखवलं. (National Games Shooting Championship)

सिफ्त कौर सामराही सुवर्ण पदकानंतर खुश होती. अंजुम मूदगिल (Anjum Moudgil) आणि सुरभी भारद्वाज यांना मागे टाकून तिने सुवर्णाची कमाई केली. आणि फॉर्ममध्ये परतल्याचा आनंदही तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.