New Tariff War : डोनाल्ड ट्रंप यांनी पुकारलेलं व्यापारी युद्ध नेमकं काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होतोय?

कॅनडा, चीन आणि मेक्सिकोनं अमेरिकन शुल्कवाढीला जशास तसे उत्तर दिले आहे.

174
New Tariff War : डोनाल्ड ट्रंप यांनी पुकारलेलं व्यापारी युद्ध नेमकं काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होतोय?
New Tariff War : डोनाल्ड ट्रंप यांनी पुकारलेलं व्यापारी युद्ध नेमकं काय आहे? त्याचा भारतावर काय परिणाम होतोय?
  • ऋजुता लुकतुके

अमेरिकेतील सत्ता बदलानंतर जागतिक पातळीवर पुन्हा एकदा व्यापारी युद्धाचे वारे वाहू लागले आहेत. २० जानेवारीला अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांची सत्ता सुरू झाली. आणि त्यांनी सुरुवातीच्या आठवड्यातच आपलं नवीन शुल्क धोरण ठणकावून सांगितलं. ‘जे देश अमेरिकेतील वस्तूंच्या आयातीवर मजबूत आयात शुल्क लावतात, त्या देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या मालावरही शुल्क वाढवण्यात येईल,’ असं हे धोरण आहे. आणि त्यानंतर अमेरिकेनं चीन, ब्राझील, मेक्सिको आणि कॅनडातून येणाऱ्या वस्तू व सेवांवरील शुल्क लगोलग वाढवलंही. भारतही अमेरिकेच्या रडारवर असल्याचं दिसतंय. कारण, ट्रंप यांनी भारताचं नाव अनेकदा घेतलं आहे. (New Tariff War)

पण, आता चीनच्या नेतृत्वाखाली काही देशांनी अमेरिकेला जशास तशे उत्तर देण्याचं ठरवल्यामुळे जगभरात पुन्हा एकदा व्यापारी युद्ध सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी अमेरिकेतून होणाऱ्या आयातीवरील शुल्कात वाढ केली आहे. या सगळ्याचा परिणाम जगभरातील वस्तू व सेवांच्या व्यापारावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तर जगभरात चलनांमध्येही घसरण झाली आहे. (New Tariff War)

(हेही वाचा – National Games Shooting Championship : सिफ्त कौर सामरा, जोनाथन एंथोनीला सुवर्ण)

अमेरिकेच्या नव्या धोरणामुळे अमेरिकन ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू ज्यामध्ये टोमॅटो, अवाकाडो आणि टकीला यासाठी अधिक दाम मोजावा लागेल. कारण, डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी चीन, मेक्सिको आणि कॅनडामधून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर नव्यानं शुल्कवाढ केली आहे. अमेरिकन जनता सध्या महागाईने त्रस्त होती. त्यांना दिलासा म्हणून डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी हे धोरण अवलंबलं होतं. अमेरिकन माणसांच्या हातात पैसा खेळता राहील, असं ट्रंप यांनी जनतेला दिलेलं वचन आहे. त्या बदल्यात ते बाहेरून आलेल्या मालावर शुल्क वाढवत आहेत. (New Tariff War)

फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार अमेरिकेचे तीन प्रमुख व्यापारी भागीदार चीन, मेक्सिको आणि कॅनडा आहे. या तीन देशांसोबत अमेरिकेचा ४० टक्के व्यापार होतो. अमेरिकेत टकीला या पेयाला मोठी मागणी असते. मेक्सिको आणि कॅनडा टोमॅटो, अवाकाडो सह इतर उत्पादनं पुरवतात. २०१९ ते २०२१ मध्ये अमेरिकेत ९० टक्के अवाकाडो मेक्सिकोतून आयात झालं होतं. ट्रंप यांनी या देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावल्यास त्याचा थेट भार अमेरिकन नागरिकांवर होणार आहे. (New Tariff War)

(हेही वाचा – खारघरमध्ये इज्तेमासाठी जमले होते लाखो तबलिगी Muslim; सोशल मीडियात नेटकऱ्यांनी व्यक्त केली चिंता)

अमेरिका चीनमधून दरवर्षी अब्जावधी डॉलर रकमेची उपकरणं आणि मशिनरींची आयात करते. ज्याचा वापर टीव्ही, स्मार्टफोन आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये केला जातो. अमेरिकेनं शुल्क लादल्यास चीनकडून देखील पलटवार केला जाऊ शकतो. मेक्सिको आणि कॅनडानं पलटवार केला आहे. कॅनडानं अमेरिकेतून आयात केल्या जाणाऱ्या १,२५६ वस्तूंवर शुल्क लावण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये अंडी, डेअरी उत्पादनं, ताजी फळं, भाषा, लाकूड, पेपर उत्पादन, इलेक्ट्रॉनिक साहित्याचा समावेश आहे. व्यापारी युद्धामुळे दुसऱ्या देशांसोबत अमेरिकेच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो. (New Tariff War)

डोनाल्ड ट्रंप (Donald Trump) यांनी अध्यक्ष झाल्यानंतर शुल्क वाढवत अमेरिकेला मजबूत करण्याचा मार्ग स्वीकारल्यानं जगभरातील गुंतवणूक अमेरिकेकडे आकर्षित होऊन डॉलर मजबूत झाला. याचा परिणाम इतर देशांवर देखील होत आहे. जगभरातील इतर चलनांमध्ये घसरण झाल्यानं त्यांना अमेरिकेशी व्यापार करताना अधिक रक्कम मोजावी लागेल. त्यामुळं येत्या काळात अमेरिकेच्या व्यापारावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा परिणाम कसा होतो ते पाहावं लागेल. (New Tariff War)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.