REPO Rate Cut ? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार?

तज्जांच्या मते यंदा १ टक्क्यांपर्यंतची कपात बघायला मिळू शकते.

55
REPO Rate Cut ? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार?
REPO Rate Cut ? रिझर्व्ह बँक रेपो दरात कपात करणार?
  • ऋजुता लुकतुके

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर आता वेळ झाली आहे ती रिझर्व्ह बँकेच्या तिमाही पतधोरणाची. येत्या ७ फेब्रुवारीला मुंबईत रिझर्व्ह बँकेची (Reserve Bank) पतधोरणाची बैठक होणार आहे. आणि इथेही सामन्य ग्राहकांना कर्जाच्या हफ्त्यात सवलत मिळू शकते अशी चर्चा आहे. रिझर्व्ह बँक (Reserve Bank) यंदा रेपो दरात ०.२५ टक्क्यांपर्यंत कपात करेल असा अंदाज या क्षेत्रातील जाणकार करत आहेत. येत्या ५ ते ७ तारखेपर्यंत ही बैठक चालणार आहे. आणि देशाचा विकास गतीशील करण्याच्या दृष्टीने व्याज दर कपातीचा निर्णय होई शकतो.

अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी मध्यमवर्गीयाचं १२ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त केलं आहे. आता लोकांचा कर्जावरील व्याजदर कमी करण्याची भूमिका मध्यवर्ती बँकही घेऊ शकते. कोव्हिडनंतर मागच्या अडीच वर्षांत रेपो दर (REPO Rate Cut) हे कमी झालेले नाहीत. उलट ते सातत्याने वाढले आहेत. मागच्या ७ धोरणांमध्ये ते स्थिर ठेवण्यात आले आहेत. पण, आता देशात वेगळे वारे वाहत असल्याचं अर्थसंकल्पातून समोर आलं आहे.

(हेही वाचा – Rupee vs USD : अमेरिकन डॉलरसमोर रुपयाचा नवा नीच्चांक, रुपया का घसरतोय?)

शिवाय यंदा केंद्रसरकारला रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) अडीच लाख कोटी रुपयांचा लाभांश मिळण्याचीही शक्यता आहे. गेल्या आर्थिक वर्षांत सरकारला २.३० लाख कोटी रुपयांचा लाभांश मिळाला होता.

(हेही वाचा – Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; पारा 35 अंशांच्या पुढे; हवामानाचा अंदाज काय सांगतो ?)

रिझर्व्ह बँकेसमोरचं (Reserve Bank) सगळ्यात मोठं लक्ष्य हे रुपयाची घसरण थांबवणं आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया स्थिर करणं हे आहे. त्यासाठी देशातील परकीय चलन साठा हा खर्च होत आहे. पण, हे आव्हान रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank) आगामी काळात पेलावं लागणार आहे. पण, दरम्यान देशातील महागाई दर मागच्या दोन तिमाहींमध्ये ४ रुपयांवर स्थिर राहिल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदरात कपात करण्याची संधी मिळू शकते. (REPO Rate Cut)

रिझर्व्ह बँकेचे (Reserve Bank) गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच बैठक आहे. आणि मल्होत्रा यांचा कल आधीच्या बैठकांमध्येही व्याजदर कमी करण्याकडे होता. त्यामुळे तो मूहूर्त यंदा येऊ शकतो असाही जाणकारांची होरा आहे. इतकंच नाही तर वर्षभरात विविध टप्प्यांवर मिळून एकूण व्याजदर कपात ही एका टक्क्यापर्यंत होऊ शकेल असाही अंदाज व्यक्त होत आहे. आर्थिक वर्ष २०२५ संपताना रेपो दर ५.५० टक्क्यांपर्यंत खाली येईल असं बोललं जात आहे. (REPO Rate Cut)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.