अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको (Mexico)-कॅनडावर (Canada) २५ टक्के कर लादण्याच्या निर्णयाला स्थगित दिली आहे. त्यामुळे आता कॅनडा आणि मेक्सिकोमधून होणाऱ्या आयातीवरील अतिरिक्त कर (US Tariffs) लावण्याची अंमलबजावणी किमान ३० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे, अशी घोषणा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. कॅनडा आणि मेक्सिकोला तात्पुरती सूट दिली असली तरी चीनवरील १० टक्के कर मंगळवारपासून लागू होणार आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली. त्यासोबतच चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १० टक्के कर प्रस्तावित केला होता. यानंतर ट्रम्प यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम पारडो यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवरील कर लादण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. तर चीनला यातून कोणतीही सूट न देता चीनवरील १० टक्के कर मंगळवारपासून लागू झाला आहे.
अमेकरिकेकडून (America) जर हे कर लागू झाले तर कॅनडा १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लागू होऊ शकतो, असा इशारा कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी दिला होता. सोमवारी ट्रुडो यांनी ट्विट करून सांगितले की ट्रम्प यांच्याशी त्यांची चर्चा यशस्वी झाली आहे आणि ३० दिवसांसाठी कर लादण्याचा निर्णय थांबवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला” अशी माहिती त्यांनी दिली होती. पुढे टुडो म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चांगला संवाद झाला. कॅनडा १.३ अब्ज डॉलर्सची सीमा योजना राबवत आहे. नवीन हेलिकॉप्टर, तंत्रज्ञान आणि कर्मचाऱ्यांसह सीमा मजबूत करणे, अमेरिकन भागीदारांशी समन्वय वाढवणे आणि फेंटानिलचा प्रवाह थांबवण्यासाठी संसाधने वाढवणे यासाठी प्रयत्नशील असणार आहे, असे ट्रुडो यांनी ट्विट केले आहे. ट्रुडो यांच्या घोषणेनंतर लगेचच, ट्रम्प यांनी याला दुजोरा दिला आणि शनिवारी जाहीर केलेले अतिरिक्त कर शुल्क ३० दिवसांच्या कालावधीसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मेक्सिकोवरील कर एका महिन्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी सोमवारी जाहीर केले की, “अमेरिकन राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या चर्चेनंतर मेक्सिकोमधून अमेरिकेत होणाऱ्या बेकायदेशीर औषधांच्या प्रवाहाला आळा घालण्यासाठी उत्तर सीमेवर तात्काळ १०,००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याचे आश्वासन दिले. यानंतर ट्रम्प यांनी मेक्सिकोवर लादलेला कर स्थगित केला आहे. या निर्णयाला व्हाईट हाऊसनेही दुजोरा दिला आहे. “असे म्हटले आहे. मेक्सिकोवर लादलेल्या शुल्काच्या स्थगितीमुळे दोन्ही देशांमधील आर्थिक तणाव तात्पुरता कमी झाला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community