राहुल गांधींनी सभागृहात बोलतांना सरकारवर टीका केल्यानंतर आता सत्ताधाऱ्यांकडून त्यांतील तथ्य बाहेर येत आहेत. भाजपा खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी लोकसभेत बोलतांना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची पुराव्यांसकट पोलखोल केली आहे.
खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींवर टीका करतांना म्हटले आहे की, विरोधी पक्षनेता असा असायला हवा, ज्याला संसद, कायदे, देश, देशाचे पंतप्रधान, संप्रभुता यांविषयी चांगले ज्ञान असायला हवे. माझी खासदारकीची ही चौथी टर्म आहे. एवढ्या वर्षांत मी पहिला असा विरोधी पक्षनेता पहात आहे, जो देश कसा कमकुवत होऊ शकतो, देशाचे विभाजन कसे होऊ शकते याचाच विचार करत परदेशी शक्तींसोबत सामील होऊन पूर्ण देशाची दिशाभूल कशी होईल, हेच पहात आहेत. संसदेतून देशाची दिशाभूल केली जात आहे.
(हेही वाचा – Tribal Ashram Schools : राज्य सरकारचा “एक दिवस आदिवासी आश्रमशाळेत” उपक्रम)
दुबे यांनी उघड केल्या नेहरूंच्या चुका
आचार्य क्रिपलानी (Acharya Kripalani) हे काँग्रेसचे (Congress) मोठे नेते होते. हिंदी-चिनी भाई भाईच्या नावावर नेहरूंनी (Jawaharlal Nehru) पंचशील करार अंतिम करण्याचा विचार केला, तेव्हा काँग्रेसचे आचार्य क्रिपलानी यांनी विरोध केला. त्यांनाच काँग्रेसबाहेर काढले गेले.
१९६० मध्ये एअर फिल्ड मार्शल रॉबर्ट्स म्हणाले होते की, पंचशील करारानंतर चीन आपल्यावर आक्रमण करेल आणि ते परतवून लावण्याची क्षमता नाही. तेव्हा नेहरू लोकसभेत म्हणाले, सेनेचे अधिकारी चुकीची विधाने करत आहेत. मला माझ्या देशावर विश्वास आहे. माझ्याकडे सेनेची एवढी शक्ती आहे की, आपण कोणत्याही देशाचा सामना करू शकतो, चीनचा काय प्रश्न आहे.
१९६१ मध्ये जेव्हा जनरल करिअप्पा (General Cariappa) निवृत्त होणार होते, तेव्हा मी सैनिकांना मरतांना पाहिले नाही, त्यापूर्वीच मी निवृत्त होत आहे, हे बरे झाले. खरेच त्यानंतर चीनने सीमावर्ती भागात अनेक आक्रमणे केली. त्यात आपले सैनिक मारले गेले. १९८१ मध्ये राहुल गांधी यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी एक करार स्वाक्षरी केला. ह्युवांग व्हा यांच्यासोबत १९८७ पर्यंत ८ वेळा चीनसोबत सीमाप्रश्नासाठी बैठका घेतल्या. परंतु चीनने बळकावलेला तो भाग परत मिळवण्यात त्या अपयशी ठरल्या. नेहरूंच्या काळात चीनने आपली जमीन नाही हडप केली, तर इंदिरा गांधींनी ही समिती का स्थापन केली ? चीनसोबत ८ वेळा बैठका का घेतल्या ? काँग्रेसने चीनला अक्साई चीन दिला. चिनी सेनेला लडाख, अरूणाचल प्रदेशपर्यंत येऊ दिले. तिबेट देऊन चीनला आपल्या डोक्यावर काँग्रेसने बसवले, असा घणाघात खासदार निशिकांत दुबे (MP Nishikant Dubey) यांनी केला.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community