Gambhir vs Rohit : गंभीर आणि रोहितचं ऑस्ट्रेलियात खरंच भांडण झालं होतं का? गंभीर याविषयी काय सांगतो?

Gambhir vs Rohit : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संघात ताळमेळ नसल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

41
Gambhir vs Rohit : गंभीर आणि रोहितचं ऑस्ट्रेलियात खरंच भांडण झालं होतं का? गंभीर याविषयी काय सांगतो?
  • ऋजुता लुकतुके

गौतम गंभीरला प्रशिक्षक म्हणून स्वत:ला अजून सिद्ध करावं लागणार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ टी-२० मालिका जिंकल्या असल्या तरी कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघाची पाटी अजून कोरी आहे. त्यातच गंभीर मुख्य प्रशिक्षक असताना तो, कर्णधार रोहित आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे रणनीतीच्या बाबतीत एकाच प्रतलावर नसल्याचा आरोप संघ ऑस्ट्रेलियात असल्यापासून होतो आहे. खासकरून रोहित आणि गंभीर यांच्यातील संबंधांवर आता गौतम गंभीरने स्वत: उत्तर दिलं आहे. (Gambhir vs Rohit)

‘आम्ही सगळे भरपूर क्रिकेट एकत्र खेळलो आहोत. एका महिन्यापूर्वी संघाविषयी कितीतरी अफवा पसरल्या होत्या. भारतीय क्रिकेट हे असंच आहे. जेव्हा निकाल मनासारखे लागत नसतात तेव्हा इथं ड्रेसिंग रुमविषयी बरंच काही बोललं जातं. पण, सगळं ठिक होतं, जेव्हा निकाल तुमच्या बाजूने लागतात,’ असं गंभीर मुंबईतील पाचव्या टी-२० सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाला होता. थोडक्यात, त्याने आपली बाजू स्पष्ट केली आहे. (Gambhir vs Rohit)

(हेही वाचा – Manipur मध्ये अतिरेकी संघटनांच्या सात सदस्यांना अटक, शस्त्रे आणि वाहने जप्त)

कारण, बोर्डर-गावस्कर चषक सुरू असताना दोन प्रकारच्या चर्चा मीडियामध्ये सुरू होत्या. एक म्हणजे कसोटी मालिकेत कुणाला खेळवायचं आणि कुणाला विश्रांती द्यायची यावर संघ प्रशासनात एकमत नाही. अश्विनला मालिकेच्या मध्यावर निवृत्त होऊ देण्याचा निर्णय नेमका कुणी आणि कधी घेतला तसंच पाचव्या कसोटीत कर्णधाराला वगळण्याचा निर्णय नेमका कुणाचा होता? की रोहित स्वत:हून या कसोटीतून बाहेर झाला. कसोटीपूर्वी सरावाच्या वेळी रोहित आणि गंभीर एकमेकांशी बोलतही नव्हते, असं तेव्हा लिहिलं गेलं होतं आता गंभीर मुंबईत जे बोललाय, त्यामुळे गंभीरचं वक्तव्य तर मीडियाला कळलंय आणि हे ही कळलंय की, पसरलेल्या अफवा खोट्याच होत्या, असं गंभीर म्हणालेला नाही. (Gambhir vs Rohit)

आता भारतीय संघ इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स करंडकासाठी सज्ज होत आहे आणि एकप्रकारे ही भारतीय संघाबरोबरच प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचीही परीक्षा असणार आहे. कारण, तो मुख्य प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघ एकही एकदिवसीय सामना जिंकलेला नाही. तर बांगलादेशविरुद्धच्या २ कसोटी सोडल्या तर उर्वरित दोन मालिकांमध्ये भारताला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (Gambhir vs Rohit)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.