जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (Jawaharlal Nehru University ) प्राध्यापक राजीव सिजारिया (Rajeev Sijaria) यांना लाचखोरीच्या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी १.८ कोटी रुपयांची लाचखोरी घेतल्याची माहिती समोर आली आहे. सिजारीया हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे (Bihari Vajpayee School of Management) प्राध्यापक असून त्यांच्यावर या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांना आता अटकही करण्यात आली आहे.
( हेही वाचा : Manipur मध्ये अतिरेकी संघटनांच्या सात सदस्यांना अटक, शस्त्रे आणि वाहने जप्त)
राजीव सिजारिया (Rajeev Sijaria) हा राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद अहवालाशी संबंधित प्रकरणामध्ये सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नॅकचा (NAAC) अहवाल तयार करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिजारिया (Rajeev Sijaria) यांच्या निलंबनाच्या आदेशात असे लिहिण्यात आले आहे की, केएलईएफला अनुकूल A++ मान्यता मिळवून देण्याबाबत लाचखोरी केल्याचा आरोप करण्यात आला. तसेच त्याप्रकरणी भ्रष्टाचारात राजीव सिजारिया यांचा सहभाग असल्याचे निदर्शनास आले. त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा त्यांनी गैरवापर केला. त्यामुळेच सिजारियांना सीबीआय (CBI) चौकशी आणि संबंधित प्रकरणावर विभागीय चौकशीबाबत निकाल समोर येईपर्यंत विद्यापीठाच्या सेवेतून तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. त्यांना निलंबन करण्याचा आदेश हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठांच्या कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community