Cattle Smuggler : गो तस्कर दिसला तर थेट गोळी मारण्याचा आदेश देईन; चक्क कर्नाटक सरकारच्या मंत्र्याने घेतली भूमिका

एवढेच नाही तर, आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही. प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असे मंत्री वैद्य म्हणाले.

41

कर्नाटकात सध्या गो तस्करांचा (Cattle Smuggler) सुळसुळाट सुरु आहे विशेषतः उत्तर कन्नड जिल्ह्यात गो तस्करीच्या घटना मोठ्या संख्येने वाढल्या आहेत. त्यावर आता कर्नाटक सरकारमधील मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री मनकल एस. वैद्य यांनी ‘जर गो तस्कर दिसला तर भर रस्त्यात किंवा भर चौकात थेट गोळी मारण्याचा आदेश देईन’, असा इशारा दिला आहे.

(हेही वाचा Pakistan मधील हिंदूंच्या ४०० हून अधिक अस्थीचे ८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर होणार गंगेत विसर्जन; कराचीमधील महंत भारतात दाखल)

एवढेच नाही तर, आपण जिल्ह्यात अशा प्रकारची कामे चालू देणार नाही. प्रशासन गायी आणि गोपालकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे, असेही मंत्री वैद्य म्हणाले. वैद्य यांचे हे विधान होन्नावरजवळ नुकत्याच झालेल्या एका गर्भवती गायीच्या हत्येनंतर (Cattle Smuggler) पसरलेल्या आक्रोशानंतर आले आहे. गो तस्करीच्या  (Cattle Smuggler) घटना गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मी एसपींना (पोलीस अधीक्षक) सांगितले आहे की, हे थांबायला हवे आणि कुठल्याही किंमतीवर असे होऊ नये. हे चूक आहे. आपण गायीची पूजा करतो. आपण गाय प्रेमाने पाळतो. आपण हिचे दूध पिऊन मोठे झालो आहोत, असेही मंत्री वैद्य म्हणाले. आपण पोलिसांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, या गुन्ह्यात जे कुणी आढळतील त्यांच्यावर कठोर करवाई करण्यात यावी. काही जणांना अटकही झाली आहे. जर अशा घटना सुरूच राहिल्या तर, मी असे म्हणणे योग्य नाही, पण अशा आरोपींना रस्त्यात अथवा चौकात गोळी घातली जाईल, असे सुनिश्चित करावे लागेल. (Cattle Smuggler)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.