BMC Budget 2025-26 : मे पूर्वी कामे पूर्ण होणार असतील त्याच रस्त्याचे खोदकाम करा; रस्ते कामांसाठी आयुक्तांनी घालून दिली संहिता

69
BMC Budget 2025-26 : देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ ला होणार सुरु
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईतील सुमारे २०५० किलोमीटर रस्त्यांपैंकी सुमारे १३३३ किलोमीटर लांबीच्या रस्ते सिमेंटीकरणाचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्यातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे ७५ टक्के आणि दुसऱ्या टप्प्यातील ५० टक्क्याचे काम जून २०२५ पूर्ण केले जाणार असून ज्या रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण होणार आहेत, तीच कामे हाती घेऊन त्यांचे खोदकाम करण्यात यावे, अन्यथा खोदकाम करून नये अशाप्रकारच्या सूचना महापालिक आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे आपल्या अर्थसंसकल्पीय भाषणांत स्पष्ट केले. (BMC Budget 2025-26)

हरित जागा, सुधारित आरोग्य पायाभूत सुविधा, वाहतूकीच्या उपाययोजना, चालण्यायोग्य पदपथ, अत्याधुनिक वाहतूक व पार्किंग व्यवस्था या उपक्रमांद्वारे शहराच्या सर्वांगीण शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यावर भर दिला जात असल्याचे स्पष्ट करत गगराणी यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार सर्व डांबरी/पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रिटीकरण हाती घेण्यात आले आहे. आतापर्यंत, सुमारे १.३३३ कि. मी. रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. यामध्ये, उपनगरांमधील आरे रोड, अंधेरी कुर्ला लिंक रोड आणि नारायण दाभोळकर मार्ग, सर पोचखानवाला मार्ग, हुतात्मा भगतसिंग मार्गापासून नेव्ही नगरला जोडणारा नानाभाई मुस मार्ग आणि शहर परिसरातील इतर प्रमुख रस्त्यांचा समावेश आहे. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – रोजगार निर्मितीवर भर देणारे भाजपा सरकार; मंत्री Mangal Prabhat Lodha यांचे प्रतिपादन)

उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम दोन टप्प्यामध्ये हाती घेण्यात आले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यामधील एकूण ६९८ रस्त्यांची कामे (३२४ कि.मी.) जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहेत. त्यापैकी, अद्यापपर्यंत १८७ रस्त्यांची कामे (सुमारे २६टक्के) पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण १४२० रस्त्यांचे (३७७ कि.मी.) काँक्रिटीकरण करण्याचे असून त्यापैकी ७२० रस्त्यांची कामे डिसेंबर २०२४ मध्ये सुरु करण्यात आली. रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्याकरिता आय.आय.टी. मुंबई सारख्या संस्थांच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे. रस्त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या या सुधारणांमुळे रस्त्याच कनेक्टीव्हिटीमध्ये वाढ होणे अपेक्षित असून त्यामुळे प्रवास सुकर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (BMC Budget 2025-26)

पूर्व द्रुतगती महामार्गावरील संगमस्थान आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील तीन संगमस्थानांची सुधारणा करण्याचे कायदिश देण्यात आलेले असून ही कामे प्रगतीपथावर आहेत. या द्रुतगती महामार्गाशेजारी वाहनतळ विकसित केली जाणार असून वाहतूक विभागामार्फत पार्किंग अॅप विकसित करण्यात येणार आहे. हे ऍप नागरिकांना आपल्या सोयीनुसार वाहनतळांवरील जागांचे आगाऊ बुकिंग व ऑनलाईनप्रणालीद्वारे त्याचे अधिदानही करु शकतील. या सर्व उपाययोजनांमुळे वाहतूक नियमनात सुधारणा होऊन रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल, असा अंदाज गगराणी यांनी व्यक्त केला. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – Manipur मध्ये अतिरेकी संघटनांच्या सात सदस्यांना अटक, शस्त्रे आणि वाहने जप्त)

बहुस्तरीय यांत्रिकी वाहनतळ

ए विभागातील फ्लोरा फाऊंटन (हुतात्मा चौक) जवळील अप्सरा पेन शॉप जवळील जागेत १९४ क्षमतेच्या वाहनतळाकरिता कार्यदिश देण्यात आलेले आहेत. तसेच, जी/दक्षिण विभागातील वरळी अभियांत्रिकी केंद्र येथील जागेकरिता ६४० चार चाकी व ११२ दुचाकी वाहनांच्या जागेकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे भविष्यात जवळपास ८३४ वाहनांकरिता वाहनतळ उपलब्ध होणार आहे. (BMC Budget 2025-26)

‘युनिव्हर्सल पदपथ धोरण’

मुंबई शहरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होत असल्याने शहराच्या पदपथांच्या वापरास अधिक सुलभ, पादचारी व दिव्यांगांसाठी अनुकूल पदपथ तयार करण्यावर महानगरपालिका अधिक लक्ष केंद्रीत करीत आहे. त्यासाठी, ‘युनिव्हर्सल पदपथ धोरण’ तयार करण्यात आले असून ते मुंबईत राबविण्याचे प्रस्तावित आहे. (BMC Budget 2025-26)

कोस्टल रोडचे काम मे २०२५ पर्यंत पूर्ण

धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी प्रकल्प अंतर्गत वांद्रे वरळी सागरी सेतू ते प्रिसेंस स्ट्रीट उड्डाणपुलाची मार्गिका आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (मरीन डाईव्ह) ते वांद्रे वरळी सागरी उत्तर मार्गिका २७ जानेवारी २०२५ पासून सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबई किनारी ९४.५० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. (BMC Budget 2025-26)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.