जम्मू काश्मीरमधील (Kashmir) कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात दि. ३ फेब्रुवारी रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका माजी जवानाचा मृत्यू झाला होता. तसेच या हल्ल्यात जवानाची पत्नी आणि नातेवाईकांसह दोन महिला जखमी झाल्या होत्या. त्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी लष्कर ए तोयबाची (Lashkar-e-Taiba) दहशतवादी संघटना असलेल्या टीआरएफने (TRF) घेतली होती. दरम्यान या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जोरदार कारवाई करत ५०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
( हेही वाचा : BMC Budget 2025-26 : महापालिकेने महसूल वाढवण्यावर दिला भर; विद्यमान स्त्रोतासह शोधले नवीन उत्पन्नाचे मार्ग)
कुलगाम (Kulgam) दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या घटनेनंतर केवळ १२ तासांमध्येच जम्मू काश्मीर पोलिसांनी संपूर्ण काश्मीरमध्ये (Kashmir) रात्रभर धाडसत्र चालवत संशयित, दहशतवाद्यांचे सहकारी आणि दहशतवादी (Terrorism) कारवायात आधी सहभागी असलेल्या ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतलं आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांने सांगितले की, आम्ही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या नेटवर्कमधील लोकांना पकडण्यासाठी आणि ओळख पटवण्यासाठी खोऱ्यामध्ये व्यापक कारवाई सुरु केली आहे. याप्रकरणानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये (Kashmir) अलर्ट देण्यात आला आहे. (Kashmir)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community