BMC Budget 2025-26 : मुंबईतील रुग्णालयातील खाटांची संख्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या शिफारशीपेक्षा अधिक वाढणार

महापालिका आयुक्तांनी व्यक्त केला विश्वास

49
BMC Budget 2025-26 : मुंबईतील रुग्णालयातील खाटांची संख्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाच्या शिफारशीपेक्षा अधिक वाढणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयांच्या १५,३०२ रुग्णशय्या आणि खाजगी रुग्णालयांच्या ३१,०७६ रुग्णशय्या उपलब्ध आहेत, महानगरपालिकेच्या रुग्णालयाचा पुनर्विकास झाल्यानंतर यामध्ये ९७० स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी रुग्णशय्या आणि १५३ अतिदक्षता रुग्णशय्या यासह ३,५१५ रुग्णशय्यांची भर पडणार आहे. त्यामुळे नजिकच्या काळात मुंबईमध्ये एकूण ४९,८९३ रुग्णशय्या उपलब्ध होणार असून वर्ष २०२४ करीता २ कोटी इतकी लोकसंख्या गृहीत धरल्यानंतरही ही संख्या राष्ट्रीय आरोग्य धोरण, २०१७ व्या शिफारसी पेक्षा अधिक असेल असा विश्वास महापालिका आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात नमुद केला.

आरोग्य विभागासाठी सन २०२५ २६च्या अर्थसंकल्पात महसुली अर्थसंकल्पांतर्गत ५२०७ कोटी रुपये आणि भांडवली अर्थसंकल्प अंतर्गत २१७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य विभागाची माहिती देताना आयुक्त गगराणी यांनी अतिदक्षता व नवजात शिशु अतिदक्षता विभागाच्या सेवा प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ असलेल्या संस्थांकडे बाह्यस्त्रोतांद्वारे सोपवून उपनगरीय रुग्णालयांमध्ये स्पेशालिटी व सुपर स्पेशालिटी सेवांचे विस्तारीकरण करण्यावर भर दिला जात असल्याचे नमुद केले. उपनगरीय रुग्णालयांच्या विकास व पुनर्बाधणीद्वारे उपनगरीय भागात आँकोलॉजी, कार्डिओलॉजी, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, नेफ्रोलॉजी इत्यादी सुविधांची उभारणी करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Abhishek Sharma रोहित नंतरचा भारताचा नवीन हिटमॅन आहे का?)

आपला दवाखान्यात फिजीओथेरपी सेटर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना अंतर्गत आतापर्यंत डिसेंबर २०२४ पर्यंत २५० दवाखाने सुरु करण्यात आले असून आतापर्यंत ९ लाख रुग्णांनी याची सेवा घेतली आहे. नजिकच्या काळात खासगी डायग्नोस्टीक सेंटर मार्फत विविध तत्ज्ञांच्या सेवांसह एक्स रे, मॅमोग्राफी, इसीजी, सीटी स्कॅन, एमआरआयएम, या सेवा वॉवचर पध्दतीने सुरु करण्या येत आहेत. तसेच पुढील आर्थिक वर्षांत आणखी २५ आपला दवाखाना आणि ३ फिजिओथेरपी सेंटर करण्यात येणार आहे.

शून्य निस्कियान धोरण

मागील वर्षापासून शून्य निस्कियान धोरणाची अंमलबजावणीची सुरू करण्यात आली असून पुढील दोन वर्षासाठी दरसूची अंतिम करण्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे. सध्या रुग्णालय स्तरावर सर्व आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.

घरोघरी आरोग्य तपासणी मोहिम

‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ या योजने अंतर्गत संपूर्ण मुंबईमध्ये घरोघरी आरोग्य तपासणी मोहिम सुरु करण्याचा मुंबई महानगरपालिकेचा मानस आहे.

डिएनबी पदवी अभ्यासक्रम

यावर्षी ११२ विद्यार्थ्यांनी १० विषयांमध्ये डिएनबी अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेतला आहे. सन २०२५-२६ मध्ये डिएनबी पदवी (कान, नाक, घसा) व DNB पदविका (बधिरीकरणशास्त्र) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

“मीठ आणि साखर जागरुकता अभियान”

“आरोग्यम् कुटुंबम्” कार्यक्रमांतर्गत, आतापर्यंत ३० वर्षावरील २३ लाख नागरिकांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली आहे.

पुढील वर्षभरात वयोवृध्द नागरिकांवर जास्त लक्ष केंद्रीत करुन आणखी ३० लाख नागरिकांची तपासणी करण्याचे योजिले आहे. सन २०२५ पर्यंत दैनंदिन आहारात मीठाचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी करण्याच्या दृष्टीने “मीठ आणि साखर जागरुकता अभियान” व इतर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

कर्करोग सेवा मॉडेल

तोंड, स्तन आणि गर्भाशयमुख यांच्या कर्करोग नियंत्रणाकरिता “विभागनिहाय सर्वसमावेशक कर्करोग सेवा मॉडेल” द्वारे सेवांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे .सन २०२५-२६ मध्ये, ९ ते १४ वर्ष वयोगटातील शाळकरी मुलींना गर्भाशयमुखाच्या कर्करोगावरील एचपीव्ही लसीकरण प्राथमिक तत्वावर करण्यात येणार आहे.

(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : महापालिकेने महसूल वाढवण्यावर दिला भर; विद्यमान स्त्रोतासह शोधले नवीन उत्पन्नाचे मार्ग)

अशाप्रकारे होणार आरोग्य सेवांचा विस्तार आणि सुधारणा
  • नायर रुग्णालयामध्ये समर्पित कर्करोग विभाग व आपत्कालीन विभाग इमारतीचे काम.
  • केईएम, नायर आणि लो.टि.म.स. रुग्णालय येथे डायलेसिस सेवांचा विस्तार, कृत्रिम गर्भधारण सेवा (IVF) सुरु करण्यात आले.
  • डॉ. आर. एन. कूपर रुग्णालयात लिनियर एक्सिलरेटरसह सर्व आवश्यक कर्करोग उपचार सुविधा असलेले १५० खाटांचे समर्पित कर्करोग युनिट.
  • वांद्रे (प) येथे धर्मशाळेचे काम सुरु.
  • लो.टि.म.स. रुग्णालय पुनर्विकासाच्या टप्पा-१ मध्ये, नर्सिंग कॉलेज आणि निवासी विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहाचे काम पूर्णत्वास.
  • टप्पा-२ मध्ये, मुख्य रुग्णालयाच्या इमारतीसह रेडिएशन (लिनियर एक्सिलरेटर) उपचार सुविधेचा समावेश असलेल्या स्वतंत्र समर्पित आँकोलॉजी इमारतीचे काम लवकरच सुरु.
  • केईएम स्मारुग्णालयाच्या शताब्दी वर्षा निमित्त शताब्दी टॉवर व कर्मचारी भवनाच्या कामाचे भूमिपूजन.
  • केईएम रुग्णालयातील निवासी विद्यार्थ्यांसाठी वडाळा येथील अॅक्वर्थ रुग्णालय परिसरात वसतीगृहाचे काम प्रगतीपथावर.

(हेही वाचा – BJP : इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश)

बांधकाम आणि पुनर्विकास करण्यात येणाऱ्या रुग्णालयांची नावे, कंसात पूर्णत्वाचा कालावधी
  • मुलुंड (प) येथील म. तु. अगरवाल रुग्णालयाची पुनर्बाधणी : (मार्च २०२५)
  • गोवंडी येघौल शताब्दी रुग्णालय संकुलातील नवीन रुग्णालय इमारतीचे बांधकाम : (मार्च २०२५)
  • बोरीवली (प) येथील हरिलाल भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास : (मे २०२५)
  • के. बी. भाभा रुग्णालय, वांद्रे (प) येथील नवीन बाह्यरुग्ण इमारतीचे बांधकाम तसेच जुन्या रुग्णालय इमारतीच्या मोठ्या दुरुस्तीचे काम : (मार्च २०२६)
  • गोरेगांव (प) येथील सिद्धार्थ म्युनिसिपल सर्वसाधारण रुग्णालयाची पुनर्बाधणी : (एप्रिल २०२६)
  • संघर्ष नगर, कुर्ला (प) येथील नवीन सर्वसाधारण रुग्णालय आणि कर्मचारी वसाहत इमारतीचे बांधकाम : (जुलै २०२६)
  • कांदिवली (प) येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, निवासी वसतीगृह व इतर इमारतीचे बांधकाम : (नोव्हेंबर २०२५)
  • भांडूप मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम : (मे २०२६)
  • घाटकोपर (पू) येथील राजावाडी रुग्णालयाचा पुनर्विकास : (नोव्हेंबर २०२९)
  • विक्रोळी येथील क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयाचा पुनर्विकास : (ऑक्टोबर २०२७)
  • ई विभागातील कामाठीपुरा येथील सिध्दार्थ/मुरली देवरा नेत्र रुग्णालयाची (मल्टीस्पेशालिटी रुग्णालय) पुनर्बाधणी : (नोव्हेंबर २०२५)
  • कांजूरमार्ग (पू) येथील माता व बालक आणि स्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम : (मे २०२७)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.