गरिबांच्या झोपड्यांमध्ये फक्त फोटो सेशन्स करणाऱ्यांना…PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर दिले.

35

पाच दशके या देशाने ‘गरिबी हटाव’च्या खोट्या घोषणा ऐकल्या. पण, आमच्या सरकारने फक्त घोषणाच दिल्या नाहीत, तर खऱ्या अर्थाने गरिबी हटवून गरिबांची सेवा केली. त्यांना गरीबांबद्दल बोलायला कंटाळा येतो. काही नेत्यांचे लक्ष त्यांच्या घराच्या स्टायलिश बाथरुमवर असते. पण, प्रत्येक घरात नळाला पाणी पोहोचवण्यावर आमचा भर आहे. 12 कोटी लोकांना नळाचे पाणी दिले. गरिबांसाठी घरे बांधण्यावर आमचे लक्ष आहे. गरिबांच्या झोपड्यांमध्ये फोटो सेशन्स करणाऱ्यांना गरीबांबद्दल बोलताना कंटाळा येतो. समस्या ओळखून त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. प्रश्नही सोडवावा लागेल, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता केला.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर दिले. त्यावेळी सरकारने एक रुपया दिला की, लोकांपर्यंत 15 पैसे पोहोचत असायचे. त्याकाळी देशात एकाच पक्षाची सत्ता होती. देशाने आम्हाला संधी दिली आणि आम्ही या संधीचे सोने केले. आम्ही या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. आमचे मॉडेल बचत तसेच विकासाचे आहे. जनतेचा पैसा जनधन, आधार, डीबीटीद्वारे देण्यास सुरुवात केली. आमच्या काळात 40 कोटी रुपये थेट लोकांच्या खात्यात जमा करण्यात आले, असेही पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) म्हणाले.

(हेही वाचा पाकिस्तानचा नागरिक असल्याचे समजल्यावर त्याला थेट कराचीत सोडून द्या; परदेशी नागरिकांच्या प्रकरणी Supreme Court ने आसाम सरकारला फटकारले)

भारतात न जन्मलेले 10 कोटी लोक सरकारी योजनांचा लाभ घेत होते. आम्ही त्या सर्वांना बाहेर काढले अन् खऱ्या लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी मोहीम सुरू केली. आकडेमोड केल्यास 3 लाख कोटी रुपये चुकीच्या हातात पडण्यापासून वाचले. सरकारी खरेदीतही आम्ही तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला. जेएएम पोर्टलवरून जे खरेदी केले गेले, ते सामान्य खरेदीपेक्षा कमी पैशात खरेदी केले आणि सरकारचे 1 लाख 15 हजार कोटी रुपये वाचवले. आमच्या स्वच्छता मोहिमेची खिल्ली उडवली गेली, काय नाही ते बोलले गेले.  पण, सरकारी कार्यालयांतून विकल्या जाणाऱ्या रद्दीतूनच सरकारला 230 कोटी रुपये मिळाले आहेत. यातील प्रत्येक पैसा आम्ही जनतेवर खर्च केला. ‘पायाभूत सुविधांवर भर दिला…’आमचे सरकार येण्यापूर्वी पायाभूत सुविधांचे बजेट 1 लाख 80 हजार कोटी रुपये होते. आज ते 11 लाख कोटी रुपये आहे. यामुळेच भारताचा पाया कसा मजबूत होत आहे. याचे वर्णन राष्ट्रपतींनी केले आहे. रस्ते, महामार्ग, रेल्वे, गावातील रस्ते, सर्वांसाठी विकासाचा भक्कम पाया रचला आहे. सरकारी तिजोरीत बचत करायला हवी आणि त्याचा लाभ जनतेला मिळायला हवा, हेही आम्ही ध्यानात ठेवले आहे, असेही पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) म्हणाले.

‘दिल्लीत अशी काही कुटुंबे आहेत, ज्यांनी कौटुंबिक संग्रहालये बनवली आहेत. आम्ही पीएम म्युझियम बांधले आहे. आम्ही संविधान सर्वोच्च ठेवतो, विषारी राजकारण करत नाही. आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधतो. काही लोक शहरी नक्षलवादी भाषा बोलतात, हे देशाचे दुर्दैव आहे. भारतीय राज्याविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्यांना ना राज्यघटनेचा आत्मा वा कळू शकतो ना देशाची एकात्मता कळू शकते. जम्मू-काश्मीर आणि लडाख सात दशकांपासून घटनात्मक अधिकारांपासून वंचित होते. हा राज्यघटनेवर आणि जम्मू-काश्मीरच्या जनतेवरही अन्याय आहे. आम्ही कलम 370 ची भिंत पाडली. देशवासीयांना जे हक्क आहेत, ते आता तेथील जनतेला मिळत आहेत. पीएम मोदी म्हणाले की, ‘संविधान मजबूत करण्यासाठी संविधानाचा आत्मा जगला पाहिजे. आम्ही संविधान जगणारे लोक आहोत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात आपण त्या सरकारच्या त्या वर्षातील कार्यकाळाचा तपशील देतो, अशी आपली परंपरा आहे. राज्यातील राज्यपालांचे अभिभाषण हे राज्य सरकारच्या कार्यकाळाचा तपशील असतो. गुजरातने 50 वर्षे पूर्ण केली तेव्हा मी मुख्यमंत्री होतो. या सुवर्णमहोत्सवी वर्षात गेल्या 50 वर्षातील सभागृहातील सर्व राज्यपालांचे अभिभाषण एका पुस्तकाच्या स्वरूपात तयार करण्यास सांगितले होते, जे आज सर्व ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहे, असेही पंतप्रधान मोदी  (PM Narendra Modi) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.