BMC Budget 2025-26 : मुंबईतील विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी होणार खुले

87
BMC Budget 2025-26 : मुंबईतील विक्रोळी, नाहूर, गोखले आणि कर्नाक पूल पावसाळ्यापूर्वी होणार खुले
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

विक्रोळी पूल, नाहूर पूल (टप्पा-१), गोखले पूल व कर्नाक पूल या रेल्वेरुळांच्या उड्डाणपुलांचे काम येत्या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करुन हे पूल वाहतुकीस खुले करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच, बेलासीस पुलाचे काम करण्यासाठीचा कंत्राट कालावधी एप्रिल २०२६ पर्यंत आहे. परंतु या पुलाचे बांधकाम नियोजित कालावधीपूर्वी पूर्ण करुन सन २०२५ अखेरपर्यंत वाहतुकीस खुला करण्याचा महापालिकेचा मानस असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी अर्थसंकल्पीय भाषणांत स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्या पूल विभागासाठी चालू आर्थिक वर्षासाठी ५५५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आगामी वर्षांसाठी ८२३८.७३ काटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पूल खात्यामार्फत जीर्ण पुलांचे बांधकाम पाडून पुनर्बाधणी करण्याचे पुलांच्या मोठ्या दुरुस्त्या व पूलांच्या किरकोळ दुरुस्त्या तसेच गोरेगाव लिंक रोड, मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्प, दहिसर (प) ते भाईंदर (प) पर्यंत उन्नत मार्ग (किनारी रस्त्याचा अंतिम भाग), मढ वर्सोवा पूल, महाराष्ट्र नगर पूल, ऑरेंज गेट पूल, शीव रेल्वे स्थानक येथील रुळांवरील पूल, इत्यादी प्रतिष्ठित व महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे रुळांवरील पुलाचे काम, टिळक पूल दादर, रे रोड रेल्वे रुळांवरील पूल, भायखळा पूर्वेकडील पूल ही कामे मुंबई महानगरपालिकेमार्फत नेमलेल्या एम.आर.आय.डी.सी.एल. एजन्सीमार्फत (महाराष्ट्र शासन व रेल्वे मंत्रालय यांची संयुक्त भागिदारी) हाती घेण्यात आली आहेत. (BMC Budget 2025-26)

(हेही वाचा – गरिबांच्या झोपड्यांमध्ये फक्त फोटो सेशन्स करणाऱ्यांना…PM Narendra Modi यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल)

सन २०२४-२५ मध्ये पूर्ण करण्यात आलेले प्रकल्प

पी/उत्तर विभागांतर्गत लगून रोड, मालाड (प) येथील इलिया सरवत शाळेजवळील वाहतूक पुल, पी/उत्तर विभागांतर्गत मालाड (प) मधील लिंक रोड वरील मिठ चौकी जंक्शन येथे नवीन उड्डाणपुलाच्या २ टप्पा-१ व २ ये बांधकाम, आर/मध्य विभागातील श्रीकृष्ण नगर येथील पुलाची पुनर्बाधणी (टप्पा-१ व २), आर/मध्य विभागातर्गत चारकोप, बोरीवली (प) मधील गोल्डन नेस्ट अपार्टमेंट जवळील पुल, आर/मध्य विभागातील एस.व्ही. रोड वरील कल्याण ज्वेलर्स जवळील पुल, आर/उत्तर विभागातील एन. एल. कॉम्प्लेक्समध्ये दहिसर नदीवरील २ नवीन पुल, एम/पूर्व विभागातील आर.एन.ए. पार्क, चेंबूर येथील पुल, एम/पश्चिम विभागातील सर्वोदय बुद्धविहार, टिळक नगर येथील पुल, एल विभागातील पिनाकी हॉटेल, कुर्ला येथील मारवाह पुल, एम/पश्चिम विभागातील टिळक नगर रेल्वे स्थानकाजवळील नाल्यावरील पादचारी पुल, एस विभागातील जॉली बोर्ड, कांजूरमार्ग (पू) येथील नाल्यावरील पुल, एल विभागातील सत्य नगर, साकीनाका येथील नाल्यावरील पुल, जी/उत्तर विभागातील सेनापती बापट मार्गावरील माटुंगा रेल्वे स्टेशन जवळील रुपारेल महाविद्यालय येथील पादचारी पुल, एफ/उत्तर विभागातील जे. के. केमिकल नाल्यावरील पादचारी पुल, एफ/दक्षिण विभागातील आर. ए. किडवाई मार्गावरील फातिमा हायस्कूल जवळील पादचारी पुल आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. (BMC Budget 2025-26)

मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणारी पुलांची कामे

पुलाचे नाव

  • आर/मध्य विभागांतर्गत चारकोप, बोरीवली (प) येथील रवी अपार्टमेंट जवळील पुलाचे बांधकाम
  • आर/दक्षिण विभागातील नंदराम चाळ, कांदिवली (प) येथील विद्यमान पादचारी पुलाचे निष्कासन आणि शंकर लेन व इराणी वाडी रस्ता क्र. ४ ला जोडणाऱ्या नवीन पुलाचे काम
  • पी/दक्षिण विभागातील मुलताई गोरे उड्डाणपूल अंतर्गत वालभट नाल्यावरील टप्पा-१ व २. चे काम पूर्ण झाले असून टप्पा-३ चे काम प्रगतीपथावर आहे.
  • एच/पूर्व विभागातील वांद्रे (पू) ते धारावी सायन पर्यंत मिठी नदीवरील नवीन पूल
  • टी विभागातील जय हिंद कॉलनी, नानेपाडा नाल्यावरील पुलाचे बांधकाम
  • एस व टी विभागातील नाहूर रेल्वे स्थानक येथील रेल्वे रुळांवरील पूल (टप्पा-१)
  • ए व बी विभागातील कर्नाक पुलाचे पुनर्बांधकाम

(हेही वाचा – दिल्लीतील मराठी BJP च्या पाठीशी ?)

प्रगतीपथावर असलेल्या पुलांची कामे
  • अंधेरी येथील गोपाळ कृष्ण गोखले पुलाचे निष्कासन व पुनर्बांधणी
  • टप्पा-१ चे काम ११ महिन्या करण्यात आले आहे.
  • टप्पा-२ चे काम एप्रिल २०२५ पूर्ण करण्याचे नियोजिले आहे.
  • जी/दक्षिण विभागातील नेहरू विज्ञान केंद्र व नेहरू तारांगणाला जोडणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाचे बांधकाम आणि डॉ. ई. मोझेस मार्गापासून डॉ. अॅनी बेझंट मार्गापर्यंत नेहरू विज्ञान केंद्राला लागून असलेल्या नाल्यावरील पूलाचे काम १४ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • महालक्ष्मी रेल्वे स्थानकाजवळ डॉ. ई. मोझेस रोड आणि केशवराव खाडये मार्ग यावर रेल्वे रुळांवरील २ पुलांचे बांधकाम ३५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • केशवराव खाड्ये मार्ग येथील महालक्ष्मी स्थानकाजवळील बांधकाम सुरु असलेल्या पूर्वेकडील रेल्वे रुळांवरील केबल स्टेड पुलाचा एन.एम. जोशी मार्ग जंक्शन ते एस ब्रीज जंक्शन पर्यंत विस्तार आणि पश्चिमेकडील बाजूस हाजी अली जंक्शन जवळील महालक्ष्मी रेसकोर्स वाहतळामधून जाणाऱ्या बांधकामाधीन पुलाची एक मार्गिका वळविणे, याचे काम १० टक्के काम पूर्ण झाले आहे. (BMC Budget 2025-26)
  • मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानक येथील मुंबई सेंट्रल व ग्रँट रोड रेल्वे स्थानकांदरम्यान बेलासिस पुलाच्या पोहोच रस्त्यांचे निष्कासन व पुनर्बाधकाम ५ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • जे. व्ही. पी. डी. जंक्शन, अंधेरी (प) येथील जुहू वर्सोवा रोड पासून सी. डी. बर्फीवाला रस्त्यापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम ३ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • एस. व्ही. रोड येथील ओशिवरा नाल्यावरील जीर्ण वाहतूक पूल निष्कासित करुन नवीन पुलाचे बांधकाम (टप्पा-२) २ टक्के काम पूर्ण झाले आहे.
  • पी/दक्षिण विभागात मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा राम मंदिर रोड ते रिलिफ रोडपर्यंत विस्तार ६५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

(हेही वाचा – BMC Budget 2025-26 : देवनारमधील डम्पिंग ग्राऊंडवरील वीज निर्मिती प्रकल्प ऑक्टोबर २०२५ ला होणार सुरु)

गोरेगाव मुलुंड लिंक रोड – हा प्रतिष्ठित प्रकल्प चार टप्प्यांमध्ये राबविया आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व आरे येथून अत्याधुनिक तेरशा १३ मी. व्यासाच्या भूमिगत जोड बोगद्याचे काम अंतर्भूत असून त्याद्वारे भूमी अधिग्रहण भांडवली खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होईल तसेच पर्यावरणास धक्का पोहोचणार पंतप्रधान महोदयांच्या हस्ते १३ जुलै, २०२४ रोजी या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे संपूर्ण काम सन २०२८ पूर्ण करण्याचे योजिले आहे. मुलुंड गोरेगाव प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर उपनगरातील नंतर तीन मुख्य रस्ते आणि ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवासाच्या कालावधीत मोठ्याप्रमाणात बचत होऊन हा कालावधी ९० मिनिटांवरून २५ मिनिटे एवढा कमी होईल.

गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरातील मुख्य रस्ते आणि ठाण्यातील घोडबंदर रोड येथील वाहतूक कोंडी दूर होऊन प्रवासा कालावधीत मोठ्या प्रमाणात बचत होऊन या कालावधी ९० मिनिटांवरून २५ इतका कमी होईल. मुंबई उपनगरे तसेच ठाणे यामधील पूर्व-पश्चिम मार्ग सुधारण्याकरिता हा प्रकल्प एक मुख्य दुवा आहे. (BMC Budget 2025-26)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.