माजी टेस्ट अंपायर Madhavrao Gothoskar यांचा एमसीएकडून सत्कार

वानखेडे स्टेडियमच्या (Wankhede Stadium) सुवर्ण महोत्सवानिमित्ताने Madhavrao Gothoskar यांचा गौरव

35
माजी टेस्ट अंपायर Madhavrao Gothoskar यांचा एमसीएकडून सत्कार
माजी टेस्ट अंपायर Madhavrao Gothoskar यांचा एमसीएकडून सत्कार

वानखेडे स्टेडियमच्या (Wankhede Stadium) सुवर्ण महोत्सवानिमित्ताने एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक (MCA president Ajinkya Naik) यांनी कसोटी पंच (Test Umpire) माधवराव गोठोस्कर (Madhavrao Gothoskar) यांचा त्यांच्या पुण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला आणि त्यांचे आशीर्वाद घेतले.

(हेही वाचा – जमीन रुपांतरणाच्या अभय योजनेला मुदतवाढ; Maharashtra Cabinet Decision)

९६ वर्षांचे गोठोस्कर यांचा सत्कार (faliciated) करताना शिवाजी पार्क जिमखान्याचे अध्यक्ष दीपक मुरकर, सरचिटणीस संजीव खानोलकर, एमसीए सचिव अभय हडप, जी सचिव एमसीए दीपक पाटील, सीईओ एमसीए सी. एस. नाईक, समिती सदस्य एमसीए, सुरेंद्र हरमलकर आणि साहाय्यक सचिव एसपीजी सुनील रामचंद्रन आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी माधवराव गोठोस्कर यांच्यासोबत सुमारे दीड तास चर्चा केली. माधवराव गोठोस्कर यांनी जुन्या कसोटी क्रिकेट (Cricket) सामन्यांच्या आठवणींना या वेळी उजाळा दिला.

माधव गोठोस्कर (Madhavrao Gothoskar) हे एक भारतीय माजी क्रिकेट पंच आहेत. आंतरराष्ट्रीय पंच कारकिर्दीत त्यांनी १९७३ ते १९८३ पर्यंत १४ कसोटी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले. १९८१ मध्ये त्यांनी एकमेव एकदिवसीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले. १९६७ ते १९८३ दरम्यान त्यांनी एकूण ५८ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. गोठोस्कर (Madhavrao Gothoskar) यांनी १९९२ मध्ये त्यांचे पंचत्वावरील आत्मचरित्र ‘द बर्निंग फिंगर’ (The Burning Finger) लिहिले. २०२१ मध्ये क्रिकेटर्स फाउंडेशनने त्यांना भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल सन्मानित केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.