Polo T Shirts : पोलो या प्रसिद्ध स्पोर्ट्स टी शर्टची निर्मिती कशी झाली ठाऊक आहे?

Polo T Shirts : अमेरिकन डिझायनर राल्फ लॉरेनने हा ब्रँड लोकप्रिय केला

34
Polo T Shirts : पोलो या प्रसिद्ध स्पोर्ट्स टी शर्टची निर्मिती कशी झाली ठाऊक आहे?
Polo T Shirts : पोलो या प्रसिद्ध स्पोर्ट्स टी शर्टची निर्मिती कशी झाली ठाऊक आहे?
  • ऋजुता लुकतुके 

‘पोलो नेक टी शर्ट’ हा तरुणांपासून अगदी मोठ्यांचाही लाडका टी शर्ट ब्रँड आणि प्रकार आहे. २० व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा फक्त मोठे शर्ट घालण्याचीच पद्धत होती, तेव्हा मैदानी खेळांसाठी शर्ट पेक्षा टी- शर्ट बरा पडले अशी संकल्पना काही फॅशन डिझायनरनी मांडली. तेव्हाचे लोकप्रिय खेळ कुठले होते तर पोलो, टेनिस आणि युरोपात क्रिकेट. आणि हे खेळही लोक शर्ट आणि निमुळती होत जाणारी पँट घालून खेळत. यातील पोलो या खेळाशी भारताची संबंध आहे. घोड्यावरून खेळली जाणारी ही हॉकीच म्हणा हवं तर. पण, भारतात १९ व्या शतकांत या खेळाची सुरुवात झाली. आणि भारतीय महाराजांनीच हा खेळ इंग्लिशांना शिकवला असं म्हणतात. पण, हा खेळ लवकरच इंग्लंड आणि अमेरिकेत ही लोकप्रिय झाला. जमीनदार, उमराव आणि मोठे व्यावसायिक तसंच भारतातील महाराजे हा खेळ हौसेनं खेळत. (Polo T Shirts)

(हेही वाचा- जमीन रुपांतरणाच्या अभय योजनेला मुदतवाढ; Maharashtra Cabinet Decision)

१८९६ मध्ये या खेळाला साजेसा पहिला टी शर्ट न्यूयॉर्कच्या जॉन ई ब्रूक्स या ब्रँडने बनवला. पूर्ण बटनांच्या शर्टपेक्षा पुढे तीनच बटनं असलेला, त्याला कॉलर असलेला हा टी-शर्ट होता. आणि तो अल्पावधीतच लोकप्रियही झाला. १९३० मध्ये जोधपूरच्या महाराजांनी आपला संघ इंग्लिश दौऱ्यावर आणला तेव्हा त्यांचे खेळाडूही असाच टी-शर्ट घालून खेळताना दिसले. आणि हळू हळू निदान खेळताना टी-शर्ट घालण्याची पंरपराच रुढ होऊ लागली. (Polo T Shirts)

अखेर फ्रेंच टेनिसपटू आणि उद्योजक जीन लिनी लॅकोस्टेनं या टी शर्टला अधिकृतपणे स्पोर्ट्स टी शर्टचा लुक दिला. वापरायला सोपा असा हा टी शर्ट खेळाडूंना लगेच आवडायला लागला. याला समोर तीनच बटनं होती. शर्टसारखा तो घोळदार नव्हता. त्याचं कापड ऊबदार पण, घाम शोषून घेणारं होतं. आणि टी- शर्टवर डाव्याबाजूला एक मगर कोरलेली होती. लॅकोस्टे म्हणजेच मगर. आणि मग तिथून लॅकोस्टेचा हा पोलो शर्ट सगळ्यांना आवडू लागला. पण, हा पोलो टी शर्ट खऱ्या अर्थाने लोकप्रिय केला तो अमेरिकन डिझायनर राल्फ लॉरेनने. त्याने १९७५ मध्ये लॅकोस्टेकडून हा ब्रँड विकत घेतला. त्याला पोलो राल्फ लॉरेन असं नाव दिलं. आणि आपल्या कंपनीचा लोगोच असा बनवला की, त्यात पोलो खेळाडू घोड्यावर बसून हातातील स्टिकने चेंडू भिरकावत आहे. (Polo T Shirts)

(हेही वाचा- Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान सुरू ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला)

जगातील या पहिल्या टी शर्टची उपयुक्तता राल्फ लॉरेनला लगेच कळली होती. ‘रुबाबदार, सुटसुटीत आणि रंगीत,’ असा हा टी शर्ट जगभरात लोकप्रिय करण्याचं श्रेय पूर्णपणे राल्फ लॉरेनला जातं. तोपर्यंत रिवाजाच्या नावाखाली फक्त पूर्ण शर्ट परिधान करणारे पुरुष आता पोलो टी – शर्ट अभिमानाने मिरवायला लागले. तो फक्त स्पोर्ट्सवेअर न राहता बॉलिवूड सेलिब्रिटी, श्रीमंत व्यावसायिक आणि खेळाडूही हा टी शर्ट वेगवेगळ्या कार्यक्रमांना घालू लागले. आणि लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. डेव्हिड बेकहम, रॉजर फेडरर यांनी तर अलीकडच्या काळापर्यंत या ब्रँडची लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. वापरायला कॅज्युअल पण, दिसायला आणि वापरताना रुबाबदार असा हा टी शर्ट आहे. आणि त्याची लोकप्रियता ओसरायचं नाव घेत नाहीए. पोलो खेळ जसा रुबाबदार तसा हा टी शर्ट आहे म्हणूनच लॉरेनने त्याला पोलो नाव दिलं. आणि आता पोलो हा ब्रँड राल्फ लॉरेनशी एकरुप झाला आहे. (Polo T Shirts)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.