![PM Narendra Modi महाकुंभ दौऱ्यावर ; अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी पंतप्रधानांनी का निवडली ५ तारीख ? जाणुन घ्या ... PM Narendra Modi महाकुंभ दौऱ्यावर ; अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी पंतप्रधानांनी का निवडली ५ तारीख ? जाणुन घ्या ...](https://www.marathi.hindusthanpost.com/wp-content/uploads/2025/02/लोकसभा-निवडणुक-२०२४-7-696x377.webp)
प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभमेळा (Mahakumbh 2025) सुरु आहे. दररोज लाखो भाविक या उत्सवात सहभागी होत असून पवित्र स्नान करत आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (5 फेब्रुवारी) महाकुंभ मेळ्याला भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) बुधवारी माघ महिन्याच्या अष्टमी तिथीला शुभ मुहूर्तावर पवित्र त्रिवेणी संगमात (Triveni Sangam) पवित्र स्नान करणार आहेत.
पंतप्रधान मोदींचे संपूर्ण वेळापत्रक (PM Narendra Modi )
- पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi ) सकाळी 9:10 वाजता नवी दिल्लीहून निघतील आणि 10:05 वाजता प्रयागराजमधील बमरौली विमानतळावर पोहोचतील.
- विमानतळावरून सकाळी 10.35 वाजता हेलिकॉप्टर महाकुंभ परिसरातील डीपीएस मैदानावर असलेल्या हेलिपॅडवर उतरेल.
- पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi )सकाळी 10.45 वाजता अरेल घाटावर पोहोचतील.
- आरेल घाटातून निषाद राज क्रूझचे बोर्डिंग संगम नाक्यावर पोहोचेल.
- संगमावरील त्रिवेणीच्या प्रवाहात स्नान आणि गंगापूजन करतील.
- संगमावरच संत-महात्म्यांना भेटण्याचा कार्यक्रमही प्रस्तावित आहे.
- महाकुंभ परिसरातून बाहेर पडल्यानंतर डीपीएस मैदानावरून नवी दिल्लीला रवाना होतील. (PM Narendra Modi )
पंतप्रधानांनी का निवडली ५ तारीख ? (PM Narendra Modi )
महाकुंभमधील अमृत स्नानाच्या (Amrit Snan) मुहुर्तांऐवजी पंतप्रधान मोदींनी ५ फेब्रुवारी हा दिवस का निवडला याची चर्चा सुरू आहे. हिंदू पंचांगानुसार, ५ फेब्रुवारी रोजी माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीमधील अष्टमी ही तिथी आहे. ती धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी तप ध्यान आणि साधना करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. या दिवशी जे लोक तप, ध्यान आणि स्नान करतात, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी श्रद्धा आहे. याशिवाय हा दिवस भीष्माष्टमीच्या रूपात ओळखला जातो. याबाबतच्या अधिकन माहितीनुसार महाभारतातील युद्धादरम्यान, शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह हे सूर्याने उत्तरायणाला सुरुवात करण्याची आणि शुक्ल पक्षाच्या सुरुवातीची वाट पाहत होते. माघ महिन्याच्या अष्टमीदिवशी त्यांनी श्रीकृष्णाच्या उपस्थितीत आपले प्राण त्यागले. त्यानंतर त्यांना मोक्ष प्राप्ती झाली. (PM Narendra Modi )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community