-
ऋजुता लुकतुके
राष्ट्रीय सुरक्षा दलातील कमांडोला ब्लॅक कॅट म्हणूनही ओळखलं जातं. देशातील अंतर्गत सुरक्षा व बाहेरुन हल्ला झाल्यास तो थोपवण्यासाठी या दलातील जवानांना विशेष प्रशिक्षक दिलं जातं. १९८४ च्या ऑपरेशन ब्लूस्टार नंतर या दलाची स्थापना करण्यात आली होती. आणि तेव्हापासून प्रत्येक दहशतवादी हल्ला तसंच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या जवानांनी जीवावर उदार होऊन जनतेला मदत केली आहे. एनएसजी कमांडो हे त्यांच्या बहादुरीसाठी ओळखले जातात. आणि त्यासाठी त्यांना मिळणारं प्रशिक्षणही इतर दलांच्या तुलनेत अधिक कठीण असतं. कारण, अत्याधुनिक शस्त्र आणि अस्त्रांशी मुकाबला करण्याचं सामर्थ्य या दलाकडे असावं यासाठी या प्रशिक्षणाची आखणी करण्यात आली आहे. (NSG Commando Salary)
(हेही वाचा- Polo T Shirts : पोलो या प्रसिद्ध स्पोर्ट्स टी शर्टची निर्मिती कशी झाली ठाऊक आहे?)
एनएसजी कमांडो त्यांच्यावरील जबाबदारीनुसार तीन प्रकारच्या सेवा बजावतात,
-
स्पेशल ॲक्शन ग्रुप – दहशतवादाशी मुकाबला
-
स्पेशल रेंजर ग्रुप – अतीमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा देणं
-
स्पेशल कम्पोझिट ग्रुप – विविध राज्यात दहशतवादाला प्रत्युत्तर देण्यासाठी बनवलेला गट
एनएसजी कमांडो होण्यासाठी तुम्हाला इतर कुठल्याही सशस्त्र भारतीय दलात काम करण्याचा ३ वर्षांचा अनुभव असावा लागतो. तुमचं वय ३५ वर्षांच्या खाली असलं पाहिजे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून किमान स्नातक परीक्षा उत्तीर्ण केलेली असली पाहिजे. याशिवाय शारीरिक क्षमता चाचणीही घेतली जाते. (NSG Commando Salary)
सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इतर सशत्र दलांमध्ये कामाचा अनुभव असलेल्यांनाच एनएसजी कमांडो होता येतं. त्यासाठी वेळोवेळी सरकारकडून जाहिराती काढल्या जातात. आणि इच्छूक उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर पात्र उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी बोलावलं जातं. शारीरिक चाचणीनंतर तुमची मुलाखत व इतर परीक्षा घेतल्या जातात. आणि निवड झालेल्या उमेदवारांना मग अत्याधुनिक प्रशिक्षण दिलं जातं. पुढील प्रशिक्षणासाठी कमांडोंना परदेशातही पाठवलं जातं. (NSG Commando Salary)
(हेही वाचा- PM Narendra Modi महाकुंभ दौऱ्यावर ; अमृत स्नानाच्या मुहुर्तांऐवजी पंतप्रधानांनी का निवडली ५ तारीख ? जाणुन घ्या …)
एनएसजीमध्ये भरती झाल्यावर प्रशिक्षणाच्या काळात कमांडोंना १८,००० रुपयांचा भत्ता मिळतो. प्रशिक्षणानंतर सेवेत सामावून घेतल्यानंतर कमांडोंना अनुभव व जबाबदारीनुसार, ४०,००० रुपये ते ८५,००० रुपये इतका मासिक पगार मिळतो. या मूळ पगाराबरोबरच कर्मचाऱ्यांना विविध प्रकारचे भत्ते आणि सरकारी निवासस्थान, रेशन, कँटिन यासारख्या सुविधाही मिळतात. (NSG Commando Salary)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community