Tiger Hunting : महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील वन विभागांना रेड अलर्ट ; वाघांची शिकार करणाऱ्या ७ टोळ्या सक्रिय

33
Tiger Hunting : महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील वन विभागांना रेड अलर्ट ; वाघांची शिकार करणाऱ्या ७ टोळ्या सक्रिय
Tiger Hunting : महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेशातील वन विभागांना रेड अलर्ट ; वाघांची शिकार करणाऱ्या ७ टोळ्या सक्रिय

बहेलिया टोळीने दीड ते दोन वर्षांत राज्यात २५ हून अधिक वाघांची शिकार (Tiger Hunting) केली. यातून सुमारे सात कोटी रुपयांचा व्यवहार केला, अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार महिन्यांपासून बहेलिया (Bahelia) टोळीतील शिकारी राज्यात आहेत. परंतु, वन खात्याला त्याचा सुगावादेखील लागलेला नाही. मेळघाट वन्यजीव गुन्हे शाखेमुळे राजुरा वन खात्याला बहेलियांचा सुगावा लागला. त्यांच्या माहितीवरूनच वन खात्याच्या चमूने बहेलियांचा म्होरक्या अजित राजगोंड (Ajit Rajgond) याला अटक केली. (Tiger Hunting)

रेड अलर्ट जारी
सध्या देशात वाघांची शिकार (Tiger Hunting) करणाऱ्या ७ टोळ्या सक्रिय आहेत. यामुळे मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प (Tiger Project) आणि अभयारण्यातील वाघांचे जीव धोक्यात आहेत. त्यामुळेच वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाने रेड अलर्ट जारी केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगड (Chhattisgarh) , मध्य प्रदेशातील वन विभागांना निगराणीत वाढ करण्याची सूचना देण्यात आली आहे. यात बावरिया, पारधी, सपेरा, मोंग्या, कंजर, बंजारा आणि बहेलिया या भटक्या तसेच शिकारी समुदायातील सदस्यांच्या टोळ्या शिकार (Tiger Hunting) तसेच वाघांच्या अवयवांची तस्करी करण्यात सक्रिय आहेत.

अलर्ट अहवालात काय ?
काही दिवसांपूर्वी चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वाघाच्या शिकारीप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली. त्यांनी आसाम मार्गे म्यानमारला कातडीची तस्करी केल्याची कबुली चौकशीत दिली. या मोबदल्यात त्यांना गलेलठ्ठ पैसे मिळाले असून व्यवहाराचा तपशीलही हाती लागला आहे. त्यानंतर अलर्ट जारी केला आहे. ३०-४० शिकाऱ्यांचे टोळके, महिला, मुलांसोबत एकत्र प्रवास करतात, असे अलर्ट अहवालात म्हटले आहे. (Tiger Hunting)

शिकारीनंतर काय ?
शिकारीत तरबेज असलेले पुरुष नट, कंजर, बहेलिया, पाठकटवा, मेव, बंजारा आदी स्थानिक शिकारी समुदायाच्या संपर्कात असतात. ते वाघांचा शोध घेतात. शिकारीनंतर वाघाची कातडी, हाडे काढून घेतात. कातडी-हाडांना मीठ लावून वाळवतात. नंतर उरलेले मांस वाटून जोरदार मेजवानीही करतात. वन्यजीव व्यापारी या शिकारी टोळ्यांच्या संपर्कात असतात. तस्करीचे साहित्य हाती आल्यानंतर एक अथवा दोन पुरुष तस्कारीचे साहित्य घेऊन जाण्यासाठी महिला व मुलांसोबत प्रवास करतात. वाघ आणि बिबट्यांच्या कातडी २ घोंगड्यांमध्ये शिवून ठेवतात. त्यामुळे तपास संस्थांना हुलकावणी देणे आरोपींना शक्य होते. पोत्यात भरून तंबूखाली ही कातडी दडवून ठेवली जाते. (Tiger Hunting)

चीन, थायलंडमध्येही पाठवले अवयव
मेघालयातील शिलाँग येथून अटक केलेला माजी सैनिक लालनेईसंग आणि अजित राजगोंड यांच्यात २० लाखांचा व्यवहार झाल्याची सूत्रांची माहिती आहे. लालनेईसंग याला किमान ९ ते १० वाघांचे अवयव पाठवण्यात आल्याची शंका आहे. त्याने चीन, थायलंडमध्ये ही तस्करी केल्याचे समजते. वाइल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोने २०१५ मध्ये अजितला तिरुपती येथून अटक केली होती. सीबीआयने या राजगोंडला शिक्षा ही दिली होती. मात्र सप्टेंबर २०२४ मध्ये अजित हा जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता. (Tiger Hunting)

आणखी १६ आरोपींना अटक
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अजित राजगोंड ऊर्फ अजित पारधी यांच्यासह इतर सर्व आरोपींच्या वनकोठडीत वाढ करण्यात आली आहे. तेलंगणातील आसिफाबाद येथून आणखी १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे सर्व बहेलिया टोळीतील शिकारी असल्याचे सांगण्यात येत आहे. (Tiger Hunting)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.