अमेरिकी (america) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चिनी (China) वस्तूंवर १० टक्के आयात कर लादण्याची घोषणा केल्यानंतर आता चीननेही जशास तसे प्रत्युत्तर देत अमेरिकेतून आयात करण्यात येणार्या विविध वस्तूंवर १० ते १५ टक्के आयातशुल्क लागणार असल्याची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे जगात व्यापारी युद्धाला तोंड फुटले आहे. (China Import Duties)
(हेही वाचा – सर्व जिल्ह्यातून मुंबईसाठी थेट विमानसेवा सुरु करा; खासदार Ashok Chavan यांची मागणी)
चीनच्या वाणिज्य व्यापार मंत्रालयाने यासंदर्भात एक निवेदन जारी केलं आहे.यामध्ये म्हटलं की, अमेरिकेकडून करण्यात आलेली एकतर्फी करवाढ जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करत चीन आणि अमेरिकेच्या आर्थिक, व्यापारी हितसंबंधाला हानी पोहोचविणारे आहे. त्यामुळे देशाचे व्यापारी हित लक्षात घेता अमेरिकेतून आयात होणारा कोळसा, द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात् एलएनजी यावर १५ टक्के अधिक कर लावण्यात येणार याशिवाय कच्चे तेल, कृषी उपकरणे, बड्या कार, पिकअप ट्रक यावर १० टक्के अधिक आयातशुल्क लावण्यात येणार आहे.येत्या १० फेब्रुवारीपासून हे कर लागू होतील.चीनने अमेरिकेला काही खनिज द्रव्यांची निर्यात करण्यावरही बंधने घातली आहेत. याशिवाय अमेरिकेतील कंपनी गुगलवर विश्वासघातविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाची चौकशी करणार असल्याचे चीनने जाहीर केलं आहे.
अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्काविरोधात जागतिक व्यापार संघटना अर्थात् डब्लूटीओमध्ये याचिका दाखल करणार असल्याचे चीनचे वाणिज्य व व्यापार मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान अमेरिकेने मॅक्सिको (mexico) आणि कॅनडा (Canada) यांच्यावरील २५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय पुढील ३० दिवसांसाठी स्थगित केला. मात्र, चीनमधून आयात करण्यात येणार्या वस्तूंवर मंगळवारपासूनच १० टक्के कर लावण्यास सुरुवात होणार आहे. यामुळे चिनी (China) वस्तूंच्या किमती अमेरिकेत महागणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community