-
ऋजुता लुकतुके
ऑस्ट्रेलियन दौऱ्यात झालेला दारुण पराभव आणि कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीची हुकेलली संधी यामुळे भारतीय संघ सध्या कात्रीत सापडलाय. टी-२० प्रकारात भन्नाट फॉर्मात असलेला हा संघ एकदिवसीय प्रकारात पहिल्या विजयासाठी झगडतोय तर कसोटीतही सलग दोन मालिका गमावल्यामुळे बॅकफूटवर आहे. अशावेळी भारताची इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ६ तारखेपासून सुरू होत आहे. आणि या मालिकेपूर्वी संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने पत्रकारांना संघाच्या फॉर्मवरून खडे बोल सुनावले आहेत. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- Ind vs Eng, ODI Series : भारतीय संघातील या खेळाडूला पोलिसांनी नाकारला प्रवेश, चाहता समजून हॉटेलबाहेर दिलं घालवून )
नागपूरमध्ये सरावानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शुभमनने आपली बाजू मांडली. ‘एका मालिकेमुळे संघाला बाद ठरवता येत नाही. ऑस्ट्रेलियात आमची कामगिरी चांगली झाली नाही, हे तर झालंच. पण, संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांना सलग ३-४ मालिका जिंकण्याचा अनुभव आहे. आणि त्यांनी तशी कामगिरी पूर्वी करून दाखवलेली आहे. त्यामुळे आधीच्या कामगिरीच्या आधारे आम्हाला निकालात काढता येणार नाही,’ असं शुभमन म्हणाला. (Ind vs Eng, ODI Series)
Responsibility of being a vice-captain 👍
Learning from Captain Rohit Sharma and Head Coach Gautam Gambhir 👌
Shubman Gill shares his thoughts 💬 💬#TeamIndia | #INDvENG | @IDFCFirstBank | @ShubmanGill pic.twitter.com/L7LWgPY9nq
— BCCI (@BCCI) February 4, 2025
‘ऑस्ट्रेलियात आम्ही क्षमतेनुसार खेळ केला नाही. पण. तरीही आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो. काही वेळा नशीबानेही आमची साथ दिली नाही. अगदी सिडनी कसोटीतही शेवटच्या दिवशी बुमरा खेळला असता तर कदाचित मालिका बरोबरीत सुटली असती. आणि १-३ असा पराभवाचा आकडाही दिसला नसता. आम्ही ऑस्ट्रेलियातच यापूर्वी दोनदा जिंकलो होतो, हे विसरून चालणार नाही. आम्ही एक विश्वचषक जिंकलाय, एकाच्या अंतिम फेरीत पोहोचलोय आणि आम्ही एक चांगला संघ आहोत,’ असं शुभमन पुढे म्हणाला. (Ind vs Eng, ODI Series)
(हेही वाचा- Illegal Encroachments: बेट द्वारका येथील मशिदी आणि दर्ग्यांवर सरकारचा बुलडोझर ; गुजरात उच्च न्यायालयाने दिला आदेश)
इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका ही विराट, रोहित यांच्या फॉर्मची पुढील परीक्षा असणार आहे. ऑस्ट्रेलियात दोघेही फ्लॉप ठरले होते. आता चॅम्पियन्स करंडकाआधी त्यांच्याकडे आणखी एक संधी आहे. कारण, महत्त्वाच्या स्पर्धेत या दोघांनी चांगली कामगिरी करणं भारतासाठी महत्त्वाचं आहे. (Ind vs Eng, ODI Series)
शुभमन गिलची ही मालिका आणि चॅम्पियन्स करंडकासाठी उपकर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. २५ व्या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर २,३२३ धावा आहेत. आणि त्याची सरासरीही ५८ धावांची आहे. त्यामुळे रोहीतचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे हे उघड आहे. अशावेळी शुभमनवरही या मालिकेत नेतृत्व म्हणून लक्ष असणार आहे. (Ind vs Eng, ODI Series)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community