राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांची उशिरा रात्री झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यामुळे या भेटीमुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (CM Devendra Fadnavis)
भुजबळ यांचे स्पष्टीकरण – राजकीय चर्चा नाही, केवळ प्रशासनिक विषय
छगन भुजबळ यांनी या भेटीबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते फडणवीस यांना गृहमंत्री या नात्याने भेटले होते. त्यांनी आपल्या मतदारसंघातील काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. भुजबळ यांच्या म्हणण्यानुसार, येवला येथे पोलिसांसाठी निवासव्यवस्था, ग्राउंडच्या भिंतीचे काम, लासलगाव मार्केट सुधारणा आणि पाणीपुरवठ्याचे प्रकल्प यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Ind vs Eng, ODI Series : भारतीय संघातील या खेळाडूला पोलिसांनी नाकारला प्रवेश, चाहता समजून हॉटेलबाहेर दिलं घालवून )
अजित पवारांच्या बैठकीला गैरहजर
प्रत्येक मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर मंत्री तसेच आमदारांच्या बैठकीला ही भुजबळ गैरहजर राहिले. त्यांनी राजकीय चर्चांचा इन्कार करताना सांगितले की, “माझी गरज जिकडे असेल तिकडे मी जातो, उगाच कुठे राजकीय चर्चा करण्यासाठी मी फिरत नाही.” (CM Devendra Fadnavis)
भुजबळ नाराज, पण किती?
मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळ यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या नाराजीबाबत विचारले असता त्यांनी मिश्कील उत्तर देत सांगितले की, “माझ्या नाराजीचा थर्मामीटर अजून कुठे मिळालेला नाही, मात्र सगळ्यांना हे माहीत आहे.” त्यामुळे त्यांच्या नाराजीचे गांभीर्य किती, हे स्पष्ट झालेले नाही. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Illegal Encroachments: बेट द्वारका येथील मशिदी आणि दर्ग्यांवर सरकारचा बुलडोझर ; गुजरात उच्च न्यायालयाने दिला आदेश)
भाजपकडून मोठी ऑफर मिळणार का?
या भेटीमुळे भाजप आणि भुजबळ यांच्यातील समीकरणांबाबत चर्चांना उधाण आले आहे. काही राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की, जर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना अपेक्षित स्थान मिळत नसेल, तर भाजपकडून त्यांना मोठी ऑफर मिळू शकते. मात्र, भुजबळ यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मंत्रीपदाविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. (CM Devendra Fadnavis)
भुजबळ आणि शिर्डी भेट – राजकीय नवा डाव?
छगन भुजबळ यांनी यापूर्वी शिर्डी दौरा केला होता, त्यासंदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, “शिर्डीला गरज होती म्हणून मी तिथे गेलो होतो. आता कोणतीही आवश्यकता नसल्याने इतर ठिकाणी जाण्याचा प्रश्न नाही.” त्यामुळे त्यांच्या भेटींचे वेगवेगळे अर्थ लावले जात आहेत. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा- Pune News : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त)
भविष्यातील राजकीय हालचालींवर लक्ष
या भेटीनंतर पुढील काही दिवस महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी कशा वळण घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. छगन भुजबळ यांच्या भावी राजकीय भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, ते अजित पवार गटासोबत कायम राहतात की नवीन समीकरणे तयार होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (CM Devendra Fadnavis)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community