Gold Rate : अस्थिर जागतिक परिस्थितीत सोन्याचा नवीन उच्चांक, १० ग्रॅम मागे ८२,००० च्या पार 

Gold Rate : एका महिन्यात सोनं जवळ जवळ ७,००० रुपयांनी वाढलं आहे.

36
Gold Rate : अस्थिर जागतिक परिस्थितीत सोन्याचा नवीन उच्चांक, १० ग्रॅम मागे ८२,००० च्या पार 
  • ऋजुता लुकतुके 

जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दरही वाढत असून बुधवारी सोन्याने ८२,००० रुपयांची पातळीही ओलांडली आहे. मंगळवारीच सोन्याचा भाव उच्चांकी ८२,९६३ रुपयांवर पोहोचला होता. ट्रम्प यांनी सुरू केलेलं व्यापारी युद्ध, मध्य-पूर्व आशियातील अस्थिरता यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत वाढच झाली आहे. मागच्या ३५ दिवसांत सोन्याचे दर तब्बल ६,८०१ रुपयांनी वाढले आहेत. हे दर १० ग्रॅमसाठीचे आहेत. (Gold Rate)

चांदीच्या किमतीतही वाढ झाली आहे. ते १६२ रुपयांनी महाग झाले आहे आणि ते ९३,४७५ रुपये प्रति किलो झाले आहे. पूर्वी चांदीचा दर ९३,३१३ रुपये प्रति किलो होता. २३ ऑक्टोबर २०२४ रोजी चांदीचा दर ९९,१५१ रुपये प्रति किलोवर पोहोचला होता आणि तो आतापर्यंतचा उच्चांक होता. (Gold Rate)

(हेही वाचा – Delhi Assembly Elections : दिल्लीतील उत्तर प्रदेश, हरियाणा सीमाभागात सुरक्षा व्यवस्था कडक)

New Project 2025 02 05T142950.139

(हेही वाचा – Ind vs Eng, ODI Series : ‘एका मालिकेमुळे संघाचा फॉर्म ठरत नसतो,’ – शुभमन गिल)

दिल्ली : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७८,२५० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८५,३५० रुपये आहे.

मुंबई : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७८,१०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८५,२०० रुपये आहे.

कोलकाता : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७८,१०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८५,२०० रुपये आहे.

चेन्नई : २२ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ७८,१०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ८५,२०० रुपये आहे.

(हेही वाचा – CM Devendra Fadnavis आणि Chhagan Bhujbal यांच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण)

सोनं वाढण्याची काही महत्त्वाची कारणंही आहेत. भारत गरजेच्या ८० टक्के सोनं आयात करतं आणि ही आयात अमेरिकन डॉलरमध्ये होत असताना डॉलरचा भाव रुपयाच्या तुलनेत वाढत आहे. त्यामुळे आयात भारताला महाग पडतेय. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारी युद्धा पवित्रा घेतल्यामुळे जगभरात आयात शुल्क वाढवण्याची मोहीम सुरू होत आहे. त्यातून अस्थिरता निर्माण झाली आहे. तर सणासुदीच्या दिवसांमुळेही भारतात सोन्याला मागणी आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून लोकांनी सोन्याला पसंती दिली आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होत आहे. (Gold Rate)

गेल्या वर्षी सोन्याच्या किमतीत २०.२२% वाढ झाली. त्याच वेळी, चांदीच्या किमतीत १७.१९% वाढ झाली. १ जानेवारी २०२४ रोजी सोन्याचा भाव ६३,३५२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो ३१ डिसेंबर २०२४ रोजी ७६,१६२ रुपयांवर पोहोचला. या काळात, एक किलो चांदीची किंमत प्रति किलो ७३,३९५ रुपयांवरून ८६,०१७ रुपये प्रति किलो झाली. येत्या जून महिन्यापर्यंत सोन्याचे भाव ८५ हजार रुपयांवर पोहोचू शकतात. (Gold Rate)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.