-
प्रतिनिधी
आपली भारतीय संस्कृती जपणे आवश्यक आहे. आपली संस्कृतीचे जतन केले नाही तर तरुण पिढी वाया जाऊ शकते, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरचिटणीस दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांनी बुधवारी व्यक्त केले. शिवाय पाश्चात्य उदारमतवादी विचारांमुळे भारताला धोका असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला.
(हेही वाचा – Shivjayanti 2025 : किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त वाहतुकीत मोठे बदल)
दत्तात्रेय होसाबळे (Dattatreya Hosabale) यांच्या हस्ते बुधवारी ‘हू इज रेझिंग युवर चिल्ड्रन : ब्रेकिंग इंडिया विथ युथ वॉरियर्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. हे पुस्तक राजीव मल्होत्रा आणि विजया विश्वनाथन यांनी लिहिले आहे. होसाबळे (Dattatreya Hosabale) म्हणाले की, भारतात काम करणाऱ्या पाश्चात्य उदारमतवादी विचारांमुळे देशाच्या सांस्कृतिक सातत्य निर्माण होण्यास धोका आहे. जेव्हा असे विचार आपल्या नवीन पिढीच्या मनात भरतात तेव्हा देशाची सांस्कृतिक सातत्य संपेल. त्यांनी पाश्चात्य उदारमतवादी कल्पनेचा देशाला धोका दर्शविला. ते एका म्हणाले की, पाश्चात्य उदारमतवादी विचारांनी विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांनी लोकांनी जागृत व्हावे आणि ही प्रक्रिया थांबवण्याचे आवाहन केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community