-
ऋजुता लुकतुके
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) या महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे आणि त्यासाठी तो मुंबईत जोरदार सरावही करत आहे. मुंबई इंडियन्सच्या नेट्समध्ये सचिनचे खणखणीत स्ट्रेट ड्राईव्ह पूर्वीसारखेच पाहायला मिळाले. आजूबाजूच्या इमारतीत राहणाऱ्या लोकांनी लगेच त्याचे व्हिडिओ घेऊन ते सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. सचिनची ही तयारी सुरू आहे ती इंटरनॅशनल मास्टर्स लीगसाठी. सचिन या स्पर्घेत भारतीय मास्टर्स संघाचं नेतृत्व करणार आहे.
अलीकडेच मुंबईत सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) बीसीसीआयकडून सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या सोहळ्यासाठी सचिन आपल्या कुटुंबीयांसह हजर होता. आता सचिनने पुन्हा एकदा क्रिकेटच्या नेट्समध्ये चाहत्यांना दर्शन दिलं आहे. सचिन (Sachin Tendulkar) पहिल्यासारखे खणखणीत ड्राईव्ह मारताना या व्हिडिओत दिसत आहे. मुंबई इंडियन्स फ्रँचाईजीने हा व्हिडिओ शेअर केला आहे.
(हेही वाचा – Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार)
Look 👀 who we saw 🏏 in the nets from our windows 🥹#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/viHWkHIbC4
— Mumbai Indians (@mipaltan) February 4, 2025
२२ फेब्रुवारीपासून इंटरनॅशनल मास्टर्स लीग स्पर्धा होणार आहे. भारत आणि श्रीलंकेदरम्यान स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे. तर या दोन संघांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका तसंच इंग्लंडचे संघही स्पर्धेत खेळणार आहेत. ब्रायन लारा, शेन वॉटसन, जॅक कॅलिस हे खेळाडू मैदानात आमने सामने येतील.
त्याचवेळी भारतात ६ फेब्रुवारीपासून लिजंड्स कप स्पर्धाही सुरू होत आहे. ७ लीग संघ यात सहभागी झाले आहेत. भारत व इतर देशातील अनेक माजी खेळाडू यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील ७ संघ पुढील प्रमाणे आहेत.
(हेही वाचा – Gold Rate : अस्थिर जागतिक परिस्थितीत सोन्याचा नवीन उच्चांक, १० ग्रॅम मागे ८२,००० च्या पार )
दुबई जायंट्स : शाकिब अल हसन, थिसारा परेरा, केन्नर लुईस, केविन ओ’ब्रायन, ब्रेंडन टेलर, लियाम प्लंकेट, ड्वेन स्मिथ, एच मसाकादझा, रिचर्ड लेवी, ल्यूक फ्लेचर, राहुल यादव, ख्रिस्तोफर एम, सिड त्रिवेदी, एस प्रसन्ना.
छत्तीसगड वॉरियर्स : सिद्धार्थ कौल, शेल्डन जॅक्सन, पवन नेगी, केविन कूपर, सुरेश रैना, विशाल कुशवाह, मार्टिन गुप्टिल, अभिषेक सकुजा, अंबाती रायडू, अमित वर्मा, गुरकीरत सिंग मान, अमित मिश्रा, ऋषी धवन, कलीम चंदो, उन्मूद खान सिंग, अभिमन्यू मिथुन, कॉलिन डी ग्रँडहोम
हरियाणा ग्लॅडिएटर्स : पवन सुयाल, प्रवीण गुप्ता, अबू नीशम, अनुरीत सिंग, इम्रान खान, असाला गुणरत्ने, इशांक जग्गी, हरभजन सिंग, नागेंद्र चौधरी, रिकी क्लार्क, पीटर ट्रेगो, चॅडविक वॉल्टन, मनन शर्मा.
गुजरात सॅम्प आर्मी : युसूफ पठाण, मोईन अली, ओबास पिनार, सौरभ तिवारी, केसरिक विल्यम्स, जेसल कारिया, मिगुएल कमिन्स, चंद्रपॉल हेमराज, शापूर जद्रान, मोहम्मद अश्रफुल, विल्यम पर्किन्स, नवीन स्टीवर्ट, अभिषेक, चतुरंगा डी सिल्वा, मौसीफ खान.
(हेही वाचा – Ind vs Eng, ODI Series : ‘एका मालिकेमुळे संघाचा फॉर्म ठरत नसतो,’ – शुभमन गिल)
बिग बॉईज : मॅट प्रायर, इशान मल्होत्रा, मोनू कुमार, चिराग गांधी, तमीम इक्बाल, तिलकरत्ने दिलशान, हर्शेल गिब्स, उपल थरंगा, अब्दुर रज्जाक, शॅनन गॅब्रिएल, वरुण आरोन, नील ब्रूम, करमवीर सिंग, रॉबिन बिस्ट, नमन शर्मा, कपिल राणा , विनोद चनवारिया
दिल्ली रॉयल्स : शिखर धवन, लेंडल सिमन्स, दनुष्का गुंथिलाका, अँजेलो परेरा, सहरदा लुंबा, बिपुल शर्मा, लखविंदर सिंग, राजविंदर सिंग, रियाद इम्रत, रॉस टेलर, जेरोम टेलर, सुमित नरवाल, परविंदर अवाना.
राजस्थान किंग्स : ड्वेन ब्राव्हो, अंकी राजपूत, फिल मस्टर्ड, शाहबाज नदीम, फैज फजल, शादाब जकाती, जसकरण मल्होत्रा, इम्रान ताहीर, जयकिशन कोलसावाला, राजेश बिश्नोई, कोरी अँडरसन, पंकज राव, शमीउल्ला शिनवारी, रजत सिंग, ॲशले नुसरन, ड्वेन जकाती, मनप्रीत गोनी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community