‘तुणतुणे बंद करा, पक्ष वाढवा’; शिवसैनिकांचा Aaditya Thackeray यांना सल्ला

127
'तुणतुणे बंद करा, पक्ष वाढवा'; शिवसैनिकांचा Aaditya Thackeray यांना सल्ला
  • खास प्रतिनिधी 

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करून तब्बल अडीच वर्षे झाली. त्यानंतर विधानसभेत निवडणूक होऊन शिंदे यांचे शिवसेना उबाठापेक्षा जास्त आमदार निवडून आले आणि शिंदे पुन्हा सत्तेत बसले. उबाठाला जनतेने पुन्हा नाकारले तरी गेले अडीच वर्षे सुरू असलेले गद्दार, बाप चोर, पक्ष चोरला असे रडगाणे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सुरूच ठेवल्याने शिवसैनिकही कंटाळल्याचे चित्र दिसत आहे. ‘तेच तेच तुणतुणे वाजवणे बंद करा, राज्यात फिरा, पक्ष वाढवा,’ असे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे.

जेलमधून बाहेर येताच गळाभेट

कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात संशयित आरोपी असलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना वर्षभरानंतर जामीन मिळाला आणि ते मंगळवारी ४ जानेवारी २०२५ या दिवशी जेलमधून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मातोश्री गाठली आणि आदित्य यांची गळाभेट घेतली.

(हेही वाचा – Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार)

सूरज चव्हाण प्रामाणिक

त्यावर आदित्य (Aaditya Thackeray) यांनी X या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरून दिलं त्यांच्याच वडिलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रिपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ… सूरज!”

ऑस्कर देता येतो का बघा

यावर शिवसैनिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने तर, “तेच तेच तुणतुणे वाजवणे बंद करा,” असा सल्ला दिला तर एकाने, “आता एखादा ऑस्कर देता येतो का बघा त्याला खूप मोठं काम केलं ना त्याने,” अशा शब्दात संताप व्यक्त केला.

इतरही काहींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या त्यांच्याच शब्दात :

“हे ऐकून २.५ वर्ष झाली. अजूनही यातून बाहेर आलेला नाही आहे. अरे बाहेर या, लोकांमध्ये फिरा, पक्ष बांधणी ला घ्या, नवीन नेतृत्व तयार करा आणि पुन्हा ताकदीने उभे रहा. हे करायला मेहनत लागते, ती आहे का तुमच्यात?”

“साहेब अजून खूप वेळ आहे आपल्याकडे तुमि लक्ष घाला पक्षबांधणी करा आम्ही आहोत सोबत”

“तुम्ही इथच संपलात…. पुन्हा तेच खंजीर, कोथळा… लोकं हुशार आहेत, रडव्याना जागा दाखवली..”

“आपण कधी दौरे चालू करणार? कधी महाराष्ट्र पिंजून काढणार ?की फक्त मुंबईत आणि बंगल्यात बसून भाषण करणार?”

“अरे तू आज त्याच ट्रान्स मध्ये आहेस का??? बोलायला काही नसले की ही रटाळ स्क्रिप्ट खूप उपयोगी पडत असेल नाही तुला…. अजून किती वर्ष सुरू राहील हे तुम्हीच लोकं जाणो… आणि लोकं तुम्हाला वाघ म्हणतात.. खरंच खूप irritate होते हे.”

“आता एखादा आश्रम काढा! आणि वाघाचे मांजर झालेल्या ,कधीकाळी हिंदुत्वासाठी अंगावर केसेस घेणाऱ्या सैनिकांना ” अहिंसा परमो धर्म, सर्व धर्म समान , एका कानाखाली मारली तर दुसरा गाल पुढे करा ” वगैरे आध्यात्मिक ज्ञान द्यायला सुरुवात करा !”

“जरी अजून सिध्द झाला नसला तरी खिचडी घोटाळा हे पण एक पाप च आहे. हे महाशय जामिनावर सुटलेत, निर्दोश नाही. आणि तुमच्याकडून लोकांच्या खुप अपेक्षा आहेत, असे स्टेटमेंट देऊन स्वतःची क्रेडेबिलीटी कमी करू नका.”

“भावा बाहेर निघ आता गद्दार, पळून गेले, बाप चोरला वगैरे ह्यातुन.”

“भाई तु अजुन तिथच आहेस होय…अरे दुनिया कुठल्या कुठं गेली…ह्याच्या मुळेच हारला इलेक्शन बाकी काय नाय…संघटना राहिली असेल तेवढी वाढवायचं बघ आणि जरा माणसा मध्ये जा नाहीतर next टाईम काहीच राहायचं नाही.”

“अर्धे गेले मंत्रिपदा साठी आणि उरलेले फेरीवाल्यांकडून हफ्ते गोळा करतायत. सत्यानाश केला शिवसेनेचा सगळ्यांनी. लाचार आणि गद्दार हीच ओळख झालीय दोन्ही शिवेसेनेची..”

“अजून सुद्धा यातून बाहेर या खंजीर, कोथळा,खोके ,मुंबई म्हणजे महाराष्ट्र हे डोक्यातून काढा.जरा महाराष्ट्र फिरा.लोकांमध्ये जा आणि पुन्हा ताकदीने पक्ष उभा करा.मराठी तरुणांसाठी काय व्हिजन आहे ते सांगा.मुंबईच्या बाहेर जे आहेत त्यांच्या साठी काय उद्योगधंदे आहेत ते सांगा.”

“साहेब, आपण पण चुकलातच की, जनतेने भाजप शिवसेनेला मत दिल असतानाही, फक्त मुख्यमंत्री पदाच्या हट्टापायी तुम्ही पूर्ण जनतेशी गद्दारी करून काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्तेत गेला. ज्यांच्याविरोधात लढला, त्यांच्याच सोबत गेला. मग ही जनतेसोबत केलेली गद्दारी नव्हती का??”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.