-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आता दोन आठवड्यांवर येऊन ठेपली आहे आणि स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या स्पर्धेत एकदिवसीय विश्वचषक विजेता ऑस्ट्रेलियन संघ विजयाचा प्रमुख दावेदार असेल. तर टी-२० मधील विजेता भारतीय संघही त्यांना टक्कर द्यायला उत्सुक असेल. स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत हायब्रीड पद्धतीने होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होतील. स्पर्धेपूर्वीची वक्तव्य आता सुरू झाली आहेत आणि यातील एक लक्षवेधी वक्तव्य आहे ते ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सचं. त्याने इतर सर्व संघांतील प्रमुख खेळाडूंना जवळ जवळ टोमणेच मारले आहेत आणि त्याचवेळी आव्हान दिलं आहे. (Champions Trophy 2025)
‘बेन, तुझ्या स्टोक्सना मी घाबरत नाही!’
‘ऑली, तू आता देवाची प्रार्थनाच कर!’
‘कोहली, इतकी धिमी फलंदाजी करताना मी तुला कधी पाहिलेलं नाही!’
अशा शब्दांत कमिन्सने महत्त्वाच्या खेळाडूंना आव्हान दिलं आहे आणि पुढे तो स्वत:च म्हणतो, ‘मी क्विंटन डीकॉक सारखा वागणारा पॅट कमिन्स आहे. थोडं खडूस वागणारा कमिन्स!’. हा व्हिडिओ बघणाऱ्यांना तोपर्यंत लक्षात आलेलं असतं की, ही चॅम्पियन्स करंडकाची जाहिरात आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – गुजरातमध्ये Uniform Civil Code लागू करण्यासाठी हालचालींना वेग; मसुदा समितीची स्थापना)
Pat Cummins showing no mercy😭☠️
— 𝐀. (@was_abdur) February 4, 2025
भारतीय संघही चॅम्पियन्स करंडकाची जोरदार तयारी करत आहे. भारताच्या एकदिवसीय कॅलेंडरची सुरुवात इंग्लंड बरोबरच्या ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनं होणार आहे. ही मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे आणि भारतीय उपकर्णधार शुभमन गिलने म्हटल्याप्रमाणे भारतीय संघ या हंगामाची जोरदार तयारी करत आहे. भारतीय संघासमोर डोकेदुखी असेल ती रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या फॉर्मची. त्याचबरोबर स्टार तेज गोलंदाज जसप्रीत बुमराह बंगळुरूमध्ये दुखऱ्या पाठीवर उपचार घेत आहे आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून त्याचं नाव अचानक काढून घेण्यात आलं आहे. याआधी त्याचं नाव संघाच्या यादीत होतं आणि तो शेवटच्या सामन्यासाठी तंदुरुस्त होईल अशी आशा होती. पण, आता बीसीसीआयने वरुण चक्रवर्तीचा समावेश केला असला तरी बुमराहचं नाव काढून टाकलं आहे. हर्षित राणा बुमराहचा बदली खेळाडू म्हणून आधीपासून संघात आहे. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community