अमेरिकेचे (America) नवनिर्वाचित राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे निवडणुकीचा प्रचार करत असताना त्यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे ट्रम्प इराणच्या लक्ष्य असल्याचे वारंवार बोलले जात आहे. अशातच याबद्दल डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना निर्देश देताना सांगितले की, जर इराणने हत्या केली तर त्यांना समूळ नष्ट करा. इराणवर निर्बंध घालण्याच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. दि. ४ फेब्रुवारी रोजी त्यांनी माध्यमांशी बोलताना हे विधान केले.
( हेही वाचा : पाश्चात्य उदारमतवादी विचारांमुळे भारताला धोका; आरएसएसचे सरचिटणीस Dattatreya Hosabale यांचे प्रतिपादन)
निवडणुकीच्या कालावधीत ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर हल्ला करण्याचा कट इराणने (Iran) रचला होता, असा आरोप नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या न्याय विधानाने केला होता. ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर पाळत ठेवून फरहाद शकेरी (Farhad Shakeri) (५१) या स्थलांतरित नागरिकाने हत्या करण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. शकेरी सध्या इराणमध्ये आहे. मुळात २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणी जनरल कासिम सुलेमानी (Qasem Soleimani) यांच्या हत्येला मान्यचा दिली, तेव्हा अमेरिका आणि इराणमधील वाढला होता. या पार्श्वभूमीमुळे ट्रम्प (Donald Trump) इराणच्या निशाण्यावर होते. २०२४ साली निवडणुकीचा प्रचार करत असताना ट्रम्प यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. त्यातच आता त्यांना इराणचा ट्रम्प यांना मारण्याचा डाव अमेरिकेने (America) उधळून लावला आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community