Aaditya Thackeray न्यायालयापेक्षा मोठे झाले?

79
Aaditya Thackeray न्यायालयापेक्षा मोठे झाले?
  • प्रतिनिधी

शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी खिचडी घोटाळ्यातील संशयित आरोपी सूरज चव्हाण यांना ‘प्रामाणिक’ म्हणून प्रमाणपत्र दिल्याने आदित्य ठाकरे हे न्यायालयापेक्षा मोठे झाले का? असा सवाल केला जात आहे.

जेलमधून बाहेर येताच गाठले ‘मातोश्री’

कोविड काळातील खिचडी घोटाळ्यात संशयित आरोपी असलेले आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना वर्षभरानंतर जामीन मिळाला आणि ते मंगळवारी ४ जानेवारी २०२५ या दिवशी जेलमधून बाहेर आले. त्यानंतर त्यांनी मातोश्री गाठली आणि आदित्य यांची गळाभेट घेतली.

(हेही वाचा – पर्यायी जमीन दिल्याशिवाय वनजमीन कमी करू नका; Supreme Court चा केंद्र आणि राज्यांना आदेश)

प्रामाणिक माणूस

त्यावर आदित्य (Aaditya Thackeray) यांनी ‘X’ या समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “अनेक डरपोक गद्दार झाले, पळून गेले. सर्व काही मिळूनही, चोरासारखे पळून गेले, कृतघ्न झाले. ज्या उद्धवजींनी भरभरून दिलं त्यांच्याच वडिलांचा फोटो, दिलेलं नाव चोरलं आणि आईसारख्या पक्षावर वार करुन निर्लज्जपणे मंत्रिपदं मिळवली, पापाचा अमाप पैसा साठवला. पण दुसऱ्या बाजूला मात्र, एक प्रामाणिक माणूस, आमचा लढणारा वाघ आणि भाऊ… सूरज!”

निर्दोष मुक्त केले नाही

मुंबई भाजपाचे प्रवक्ते निरंजन शेट्टी यांनी ठाकरे यांच्या ‘प्रामाणिक माणूस’ या शेऱ्यावर प्रश्न उपस्थित केला. शेट्टी म्हणाले, “सूरज चव्हाण याला अद्याप न्यायालयाने निर्दोष मुक्त केले नाही. तर त्याला जामीन मंजूर केला आहे. एक वर्ष जेलमध्ये राहून जामिनावर सुटून आल्यावर त्याला ‘प्रामाणिक’ म्हणून शेरा देणे म्हणजे ठाकरे न्यायालयापेक्षा मोठे झाले का?”

ऑस्कर देता येतो का बघा

यावर नेटकऱ्यांनी ठाकरे यांना रोखठोक उत्तरे दिलीच, शिवाय एकाने, “आता एखादा ऑस्कर देता येतो का बघा त्याला, खूप मोठं काम केलं ना त्याने,” अशा शब्दात संतापही व्यक्त केला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.